आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीची नाराजी, पराभवाला कंटाळून आत्महत्या करणारे होते ओबामा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओबामा आणि त्यांच्या आई... - Divya Marathi
ओबामा आणि त्यांच्या आई...
इंटरनॅशनल डेस्क - 2009 मध्ये अमेरिकेचे पहिले अश्वेत राष्ट्राध्यक्ष होऊन इतिहास घडवणारे ओबामा यांचा 4 ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. जगातील सर्वात शक्तीशाली राष्ट्राचे दोनदा सर्वोच्च प्रमुख झालेले ओबामा एकेकाळी आत्महत्या करण्याचा विचार करत होते. राष्ट्राध्यक्ष होण्याच्या 9 वर्षांपूर्वी आपल्या पत्नी मिशेल ओबामा यांच्या नाराजीला आणि निवडणुकीत पराभवाला ते निराश झाले होते. एवढेच नव्हे, तर त्याचवेळी त्यांनी मिशेल यांना घटस्फोट देण्याचा सुद्धा विचार केला होता. 
 

- 2000 मध्ये मिशेल यांनी ओबामांना निवडणूक लढवू नका असे सांगितले होते. पत्नीचा हट्ट त्यांच्या महत्वाकांक्षांवर जड ठरत होता. ते यावर खूप निराश झाले होते. 
- ओबामांच्या मित्रांना तर एवढी भिती होती, की ओबामा नैराश्यात आत्महत्या करतील. त्यावेळी मिशेल यांना घटस्फोट देण्यासाठी कागदपत्रे सुद्धा तयार केली होती. 
- आपल्या पतीने आपला हट्ट पूर्ण केलाच कसा नाही. यावर त्या नाराज होत्या. तेव्हा ओबामा आणि मिशेल यांच्या लग्नाला फक्त 8 वर्षे झाली होती.  
- 2000 मध्ये त्यांचा सामना शिकागो येथील जागेवर लढवणारे बॉबी रश यांच्याशी होता. या निवडणुकीत ओबामांचा सपशेल पराभव झाला होता. आपली राजकीय कारकीर्द संपलीच असे त्यांना वाटले होते. 
- ओबामा त्यावेळी मानसिक धक्का आणि नैराश्याला सामोरे जात होती. अशा कठिण समयी मिशेल यांनी कथितरीत्या त्यांची विचारपूस सुद्धा केली नव्हती. तरीही काही महिन्यांतच दोघांचे गैरसमज दूर झाले आणि पुन्हा जवळ आले.
 
 
पुढील स्लाईड्सवर... ओबामांच्या कॉलेज, गाव आणि व्हाईट हाऊसमधील खास फोटोज...
बातम्या आणखी आहेत...