आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींना कोहिनूर परत द्या, ब्रिटिश खासदार वाझ यांची सरकारला मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - येत्या नोव्हेंबरमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनच्या दौ-यावर आल्यानंतर त्यांना जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा परत द्यावा, अशी मागणी ब्रिटिश खासदार कीथ वाझ यांनी तेथील सरकारला केली आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी ऑक्सफोर्ड युनियनमध्ये ब्रिटिशांची खरडपट्टी काढणारे भाषण दिले होते. त्याने प्रभावित होऊन वाझ यांनी ही मागणी केली. वाझ म्हणाले, आर्थिक भरपाई ही क्लिष्ट व निरर्थक प्रक्रिया आहे. कोहिनूरसारख्या अनमोल वस्तू परत न करण्यासाठी काेणताही बहाणा असू शकत नाही.