आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत चरसला मोठा ब्रँड बनवण्याची तयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत बिअर आणि सिगारेटसारखेच चरस (मारिजुआना-पॉट) मोठ्या प्रमाणावर विकण्याची तयारी सुरू आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा चरस विक्री कायदा बनविण्याचा विचार सुरू होता तेव्हा कल्पना होती की, मेडिकल स्टोअरमध्ये चरस विकले जाईल. यामुळे कर्करोगग्रस्त आणि चरस, भांग घेणार्‍यांची सोय होईल. मात्र, बाजारात वेगळेच चित्र पहायला मिळते. महत्त्वाकांक्षी उद्योजकांनी जास्त फायद्यासाठी पॉटचे ब्रँडिंग आकर्षक पद्धतीने करण्याची योजना तयार केली आहे. देशभरात लाखो स्टोअर्सची साखळी, व्यावसायिक बोधचिन्ह आणि योग्य व्यवहार करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचार्‍यांच्या मदतीने पॉट विकण्यात येईल.

अमेरिकेत केंद्रीय कायद्यानुसार मारिजुआनाची विक्री करणे प्रतिबंधित आहे. त्यामुळे अशा योजना चुकीच्या वाटतात. तरीसुद्धा व्यावसायिकांना याबाबत विश्वास आहे. देशातील २३ राज्यांत पॉट वैध आहे. त्यामुळे केंद्रीय पातळीवर त्याला होकार मिळण्याची शक्यता वाढली आहे. अमेरिकेत पॉटचा वैध बाजार तीन अब्ज डॉलरचा आहे. त्यात ३५ अब्ज डॉलर वाढण्याची शक्यता आहे. ३३ वर्षांच्या अ‍ॅडम बिअरमॅनने काही वर्षांपूर्वी एक ब्रँडिंग कंपनी सुरू केली होती. कंपनीने वेबसाइट बनवली आणि ताज्या फळांचा ज्यूस, ग्रीक योगर्टसारखे अन्नपदार्थ व्यापारासाठी साहाय्यभूत होते. पॉटच्या व्यवसायात मोठ्या फायद्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्यांचा भागीदार अ‍ॅड्रयू मॉडलिनसोबत नवी कंपनी मॅडमॅन सुरू केली. कल्वेर सिटी, कॅलिफोर्नियातील कंपनी पॉटच्या व्यवसायासाठी जागा शोधण्यापासून ते मारिजुआना परवाना मिळवून देण्याचे काम करते.