आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्री श्री यांना कोलंबियाचा पुरस्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोगाटा (कोलंबिया)- कोलंबियात शांततेसाठी प्रयत्न करणारे आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांचा ‘ऑर्डेन डे ला डेमोक्रेशिया सिमॉन बॉलीवर’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

हा पुरस्कार श्री श्रींनी जगभरात केलेल्या शांतीकार्यासाठी आणि विशेषत: त्यांची संस्था आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून कोलंबियात करण्यात आलेल्या कार्याबद्दल त्यांना देण्यात आला. अहिंसेसाठी काम करत असलेल्यांना हा पुरस्कार समर्पित केल्याचे श्री श्री रवीशंकर यांनी या वेळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे या पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. ‘ऑर्डेन डे ला डेमोक्रेशिया सिमॉन बॉलिवर’ या पुरस्काराने सन्मानित श्री श्री रवीशंकर जगभरात करत असलेल्या शांतीकार्याबद्दल आम्हाला गर्व असल्याचेही पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. पेरूच्या एंडिअन संसदेचा हा सर्वात मोठा पुरस्कार असून श्री श्री रवीशंकर ते प्राप्त करणारे पहिले भारतीय ठरले आहेत.