आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरियाकडे 10 अणुबॉम्ब निर्माण करण्याची क्षमता, प्लुटोनियमचा साठा, 2011 नंतर शस्त्रास्त्रांत वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रोफाइल फोटो - Divya Marathi
प्रोफाइल फोटो
सेऊल - उत्तर कोरियाकडे प्लुटोनियमचा मोठा साठा असून १० अणुबॉम्ब निर्माण करण्याची क्षमता या देशाकडे आहे. दक्षिण कोरियाने हा दावा केला आहे. उ. कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची चाचणी बंद करणार असल्याचे आठवडाभरापूर्वी जाहीर केले होते. त्यानंतर द. कोरियाने शेजारी देशाच्या अण्वस्त्र सज्जतेविषयीचे वक्तव्य जारी केले.  
उत्तर कोरिया एकाकी कम्युनिस्ट राष्ट्र असून अमेरिकेच्या मुख्य भूमीवर क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्याची ताकद निर्माण करण्याची त्याची महत्त्वाकांक्षा असल्याचे द. कोरियाने म्हटले आहे. आतापर्यंत त्यांनी पाच अण्वस्त्र चाचण्या घेतल्याचे सेऊलच्या सूत्रांनी सांगितले.  क्षेपणास्त्र चाचण्यांची संख्या वरचेवर वाढत असल्याबद्दल द. कोरियाने चिंता व्यक्त केली. वर्ष २०१७ च्या अखेरपर्यंत क्षेपणास्त्रांचा ताफा वाढवण्याचे उद्दिष्ट उ. कोरियाचे आहे.  
सेऊलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उ. कोरियाकडे सध्या ५० किलोग्रॅम प्लुटोनियम आहे. ८ वर्षांपूर्वी या देशाने ४० किलोग्रॅम प्लुटोनियमचा साठा शस्त्रास्त्र निर्मितीसाठी वापरल्याचा दावा दक्षिण कोरियाने केला. युरेनियम कार्यक्रमाचे गूढही कायम असून त्यांच्याकडे याचाही साठा मोठा असल्याची खात्री असल्याचे दक्षिण कोरियाने म्हटले आहे. दरम्यान, उत्तर कोरियाने नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच अमेरिकेसारख्या देशाला धडकी भरेल, अशी घोषणा केली होती. एका क्षेपणास्त्राची चाचणी घेतली जाणार आहे.   वास्तविक अांतरराष्ट्रीय समुदायाने काेरियाला अणु कार्यक्रम बंद करण्यास सांगितले.
 
किम यांनी वाढवले शस्त्रास्त्र सामर्थ्य
विश्लेषकांपुढेही उत्तर कोरियाची रणनीती एक गूढ आहे. प्योंगयाँगची अणू महत्त्वाकांक्षा काय आहे याचा निश्चित निष्कर्ष काढलेला नाही. मात्र किम जोंग उन यांनी डिसेंबर २०११ पासून आपले वडील किम जोंग इल यांच्याकडून सत्तासूत्रे स्वीकारली होती. तेव्हापासून क्षेपणास्त्र व अण्वस्त्रांच्या ताफ्यात लक्षणीय भर पडल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.