सिसेक डेरेकच्या (१७) आठवणीच्या स्वरूपात फक्त एक रंगीत स्कार्फ शिल्लक आहे. काही महिन्यांपूर्वी कोबानी, सिरियामध्ये तिचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह मिळाला नाही. सिसेक अशा शेकडो तरुण कुर्दिश महिला योद्ध्यांपैकी एक होती, ज्यांनी आयएसआयएसच्या विरोधात युद्ध छेडले आहे. त्या तुर्कीबरोबर स्वातंत्र्याचे युद्ध करणार्या कुर्दिस्तान वर्कर्स पार्टीचे (
पीकेके) महिला युनिट वायपीजेचा भाग आहेत.
दहशतवादी गट इस्लामिक स्टेट ऑफ
इराक अॅण्ड ग्रेटर सिरियाच्या विरुद्ध युद्धाच्या मुख्य मोर्चावर पीकेके आणि अन्य कुर्दिश गटांनी मोर्चा संभाळला आहे. तुर्की-सिरियाच्या सीमेवर एका छोट्या गावातील १८ वर्षीय जिलन ओर्केशने महिलांवर बंदी घालणार्या आयएसला कडवे उत्तर दिले आहे. ती २०११ मध्ये वायपीजेमध्ये सहभागी झाली. तिने पहिल्यांदा जेव्हा आयएसच्या व्यक्तीला मारले, तेव्हा ती आनंदाने जोरजोरात ओरडत होती. ती म्हणते, मी त्यांना जाणीव करून देऊ इच्छिते की, त्यांना ज्याची भीती होती तेच झाले. त्यांचा एक सहकारी एका महिलेच्या हातून मारला गेला.
फक्त आयएसच्या विरोधात हत्यार उचलण्याच्या कारणाने या महिला सिरियातील एका सैनिकी कॅम्पमध्ये एकत्र आलेल्या नाहीत. पीकेकेचेे मार्क्सवादी नेते अब्दुल्ला ओकालेनने स्त्री-पुरुषांना समान दर्जा देण्यासाठी हे केले. पुरुषांच्या प्रभावाखाली असलेल्या मध्य-पूर्व भागात ही दुर्लभ घटना आहे. अब्दुल्ला नजरकैदेत आहेत. अमेरिकेने पीकेकेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. दकियानूसी समाजात अडकलेल्या ग्रामीण मुलींना लैंगिक समानतेचा नारा योग्य वाटतो. १८ वर्षांची सरिया जिलान म्हणते, महिलांवरील जबाबदार्या हळूहळू घेण्यात आल्या. आता आम्ही समाजात महिलांना त्यांचे स्थान पुन्हा मिळवून देऊ.
महिलांच्या कॅम्पच्या जवळच एक नवीन स्मशानभूमी बनवण्यात आली आहे. सूर्यास्ताच्या वेळी काही पुरुष, युद्धातील मृतांसाठी कबर खणत आहेत. सिसेकचे गाव आणि घर तेथून जास्त दूर नाही. घरात सिसेकच्या तीन बहिणी आणि आई शहिदाच्या चित्राजवळ बसलेली आहे.
आपल्या मुलीने वायपीजेत सहभागी होऊ नये, असे सिसेकच्या आईचे मत होते.
कुर्दिश गटाच्या एका सदस्यापासून प्रभावित होत ती १३ वर्षांच्या वयातच घर सोडून उत्तर
इराकमध्ये पीकेकेचा मुख्य अड्डा माउंट कंदील येथे गेली होती. १७व्या वर्षी ती मारली गेली. ओकालेनच्या आदेशाने मुलींनी गुरिल्ला सेनेत सहभागी होण्याबाबत लोकांचे मत योग्य नाही.