आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चुलत भावासोबत लग्नास नकार दिला म्हणून समारंभातच झाडल्या गोळ्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नास नकार दिल्याने ठार केलेल्या शिलानचा फोटो, तिच्या वडिलांनी फेसबुकवर पोस्ट केला. - Divya Marathi
लग्नास नकार दिल्याने ठार केलेल्या शिलानचा फोटो, तिच्या वडिलांनी फेसबुकवर पोस्ट केला.
हॅनोव्हर - 21 वर्षांची एक कुर्दीश तरुणी देश सोडल्यानंतरही परंपरेची बळी ठरली आहे. आपल्या चुलत भावासोबत लग्नास नकार देणे तिच्या जिवावर बेतले आहे. ही घटना जर्मनीतील आहे. कुर्दीश तरुणीने नापसंत केलेल्या मुलाच्या भावाने तिची गोळ्या झाडून हत्या केली. पित्याने मुलीच्या मृतदेहाचा फोटो फेसबुकवर पोस्ट करुन न्यायाची मागणी केली आहे.

- शिलान नावाच्या तरुणीचे वडील गाजी यांनी सांगितले, की ते त्यांचा परिवार इराकमध्ये सोडून जर्मनीतील हॅनोव्हर येथे राहात होते.
- जर्मनीच्या खुल्या विचारांमध्ये वाढलेली त्यांची मुलगी स्वतंत्र विचारांची होती. प्रॉपर्टी मॅनेजमेंटमध्ये तिचे शिक्षण झाले होते.
- गाझीच्या मोठ्या भावाने शिलानचे लग्न त्यांच्या मुलासोबत निश्चित केले होते. तो इराकमध्ये एक जाहिरात क्षेत्रात काम करतो. मात्र शिलानला हा विवाह मंजूर नव्हता. तिने त्याला नकार दिला होता.
- तिने वडिलांना सांगितले होते की तिला मुलगा पसंत नाही, आणि ती त्याच्यासोबत लग्न करणार नाही.
- तिच्या वडिलांनी साखरपुडा थांबवला . यामुळे संतप्त झालेल्या तिच्या दुसऱ्या चुलत भावाने 13 मार्चला शिलानवर गोळ्या झाडल्या.
पुढील स्लाइडमध्ये , वडिलांनी फोटोसोबत फेसबुकवर आणखी काय लिहिले...
बातम्या आणखी आहेत...