रक्का (सिरिया)- इस्लामिक स्टेट्सच्या (ISIS) ताब्यातून सुटलेल्या कुर्दिश महिला सध्या स्वातंत्र्य उपभोगत आहेत. पिंजऱ्यातून सुटलेल्या पोपटासारखी त्यांची अवस्था झाली आहे. आयुष्यातील प्रत्येक क्षण नवा आनंद घेऊन येतोय. सोबत त्यांच्या मनात ISIS बद्दल प्रचंड राग आहे. ISIS ची भूमी सोडून सिरियात आलेल्या या कुर्दिश महिलांनी अगदी स्वातंत्र्य अनुभवले. बुरखे काढून फेकले. हिजाब दूर केले. त्यांना पुरुषांनीही साद दिली. त्यांच्या भावना जाणून घेतल्या.
सिरियातील रोजावा भाग कुर्दिश लोकांच्या ताब्यात आहे. या भागात ISIS च्या ताब्यात असलेल्या भागातून अनेक कुर्दिश महिला आणि पुरुष शुक्रवारी आले. यावेळी त्यांनी स्वातंत्र्य उपभोगले.
रागात काढून फेकले बुरखे आणि हिजाब
सिरियातील फ्रीलान्स पत्रकार जॅक शाहिन याने ही घटना सांगितली आहे. त्याने सांगितले, की ISIS च्या ताब्यात असलेल्या भागातून अनेक कुर्दिश महिला आणि पुरुष सुटून आले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर असलेल्या उत्साह बघण्यासारखा होता. त्यांनी लगेच बुरखे काढून फेकले. ISIS ने त्यांना बळजबरी बरखे घालण्यास सांगितले होते. याला विरोध करण्यासाठी महिलांनी बुरखे फेकले. हिजाब दूर केले. स्कार्फ फाडून फेकले.
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बघा, पुढील स्लाईडवर.... फोटोत बघा महिलांनी कसे अनुभवले स्वातंत्र्य...