आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kurdish Women Fights Against Cruel ISIS Terrorists

या महिलांनी ISIS च्या अनेक क्रूर दहशतवाद्यांना पाठवले यमसदनी, पाहा छायाचित्रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुर्दीश म‍हिला सैनिक सेल्फी घेतानाचे दृश्‍य. - Divya Marathi
कुर्दीश म‍हिला सैनिक सेल्फी घेतानाचे दृश्‍य.
नवी दिल्ली : जगातील सर्वात हिंसक दहशतवादी संघटना आयएसआयएसशी (इस्लामिक स्टेट) दोन हात करणा-या या कुर्दिश महिलांचे छायाचित्रे सध्‍या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहेत. या संघटनेच्या दहशतवाद्यांना कुर्दिश महिलांनी यमसदनी पाठवले आहे. ईशान्य इराकमधील सिंजर पर्वतीय भागांत कुर्दिस्तान लेबर पार्टीमध्‍ये(पीकेके) पुरुषांप्रमाणे महिलाही सशस्त्र कारवायांसाठी नेहमी तयार असतात.
इराकमध्‍ये आयएसच्या दहशतवाद्यांची क्रूरता पाहता प्रत्येक वर्ग त्यांच्याविरुध्‍द लढण्‍याची आणि देशाच्या सुरक्षेसाठी तयार असतो. कुर्द महिलाही अशा लढाईंमध्‍ये सामील असतात. या संघर्षा दरम्यान कुर्द महिला सैनिकांची सेल्फी फोटो फेसबुक आणि ट्विटरवर मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहेत.
छायाचित्रांत महिला फुरसतीच्या क्षणांमध्‍ये आपले सेल्फी घेताना दिसत आहे. कुर्दीस्तानाचे बंडखोर पुरुष आणि महिला दोघेही एकमेंकांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करतात. यात ते आपल्या खासगी आयुष्‍याकडेही लक्ष देत नाही.
या लढवय्यांची जास्तीत जास्त वय 18 ते 25 वर्षां दरम्यान आहे. यातील अनेक महिलांना स्वत:चे कुटुंब आहेत. असे असूनही त्या आपल्या परिवाराला सोडून दहशतवाद्यांविरुध्‍द रणांगणात उरतल्या आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा क्रूर अशा आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी यमसदनी पाठवणा-या रणरांगिणींची सोशल मीडियावर शेअर झालेली छायाचित्रे..