आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुवैतने पाकिस्तानसह 5 मुस्लीम देशांच्या नागरिकांवर लावला व्हिसा बॅन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुवैत सिटी - कुवैतने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानसह आणखी तीन देशांमधून येणाऱ्या नागरिकांवर बंदी लादली आहे. इतर तीन देशांमध्ये सिरिया, इराक आणि ईराणचा समावेश आहे. विशेष म्हणजे बॅन करण्यात आलेले सर्व देश हे मुस्लीम देश आहेत. पाकिस्तानवरील बॅन तर धक्कादायक आहे कारण पाक कुवैतला व्यायवसायिक मित्र असल्याचे म्हणतो. कुवैचे साही कुटुंब पाकिस्तानात शिकारीसाठीही जाते. 

टुरिझम आणि बिझनेस व्हिसावरही बॅन 
- स्पूतनिक न्यूजच्या रिपोर्टनुसार या देशांच्या टूरिझम आणि बिझनेस व्हिसावरही बॅन लावण्यात आला आहे. 
- तसेच या देशांच्या रिहवाशांसाठी व्हिसा जारी करण्याची प्रक्रियाही थांबवण्यात आली आहे. 
- कुवैत सरकार या निर्णयाबाबत गेल्या वर्षापासून विचार करत होते असे सांगितले जात आहे. 
- कुवैतमध्ये एका शिया मशिदीत झालेल्या बॉम्ब स्फोटात 27 जणांचा मृत्यू जाला होता, तेव्हापासून याबाबत विचार सुरू होता. 

ट्रम्पचा परिणाम तर नाही.. 
- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर सात मुस्लीम देशांमधून येणाऱ्यांवर बॅन लावला आहे. कुवैतचा हा निर्णयदेखिल ट्रम्प अॅडमिनिस्ट्रेशनच्या निर्णयावर आधारित असू शकतो अशी शक्यता व्यक्त होत आहे. मात्र याबाबत कुवैतमध्ये याबाबत चर्चा सुरू होती. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...