आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुवेती जनतेचा धडा, सत्ताधारी 20 सदस्यांचा झाला पराभव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुवेत सिटी - जगातील इंधन क्षेत्रातील सर्वात श्रीमंत देश कुवेतमध्ये जनतेने कडक कायदा लागू करणाऱ्या खासदारांना चांगलाच धडा शिकवला आहे. त्यांना यंदाच्या निवडणुकीत घरी बसवण्यात आले आहे. रविवारी नॅशनल असेंब्लीचे निकाल जाहीर करण्यात आले. त्यात ५० पैकी २४ जागांवर मुस्लिम ब्रदरहुडशी संबंधित पक्षांचा विजय झाला आहे.

इस्लामी, नॅशनलिस्ट तसेच लिबरल या विरोधी पक्षांनी निवडणुकीवर चार वर्षांपासून बहिष्कार घातला होता. अखेर शनिवारी मतदान झाले. २०१२ नंतरचे ते चौथे मतदान होते. ताज्या आकडेवारीनुसार मावळत्या संसदेतील ५० पैकी २२ सदस्य पराभूत झाले आहेत तर आठ जणांनी निवडणूक लढवली नाही. तीनपैकी दोन माजी मंत्री विजयी होऊ शकले नाहीत. केवळ माजी दूरसंचार मंत्री ईसा अल कंदारी यांना सहज विजय मिळवता आला. अल्पसंख्याक शिया समुदायाच्या गटाला केवळ सहा जागी विजय मिळवता आला. गेल्या संसदेत त्यांच्याकडे ९ जागा होत्या. एका दशकातील ही कुवेतमधील सातवी सार्वत्रिक निवडणूक होती. अनेक वर्षांपासून कुवेत बजेट संकटाचा मुकाबला करत आहे. कुवेतचे आमिर शेख सबह अल अहमद अल जबर अल सबह यांनी निवडणूक प्रक्रिया योग्य प्रकारे पार पडल्याबद्दल अधिकारी व मोठ्या संख्येने मतदान करणाऱ्या जनतेचे आभार व्यक्त केले आहेत.

अरब देशांतील एकमेव संसदीय शासन प्रणाली
अरब राष्ट्रांतील समृद्ध देशांमध्ये कुवेतचा समावेश होता. देशात संसदीय शासन प्रणाली आहे. कुवेतचे आमिर देशाचे मुख्य शासक आहेत. पंतप्रधान व सरकारची नियुक्ती तेच करतात. येथे राजघराण्याशी संबंधित लोकही मंत्री होऊ शकतात, परंतु संसदेचे त्यांच्यावर नियंत्रण असते. गेल्या संसदेने मंत्र्यांच्या काही निर्णयाला विरोध करून फेटाळून लावले होते.

७० टक्के परदेशी नागरिक राहतात
कुवेतमध्ये ७० टक्के लोक परदेशातून नोकरीसाठी आलेले आहेत. ३० टक्के स्थानिकांची लोकसंख्या आहे. २००१ ते २००९ पर्यंत कुवेत अरब जगतातील मानव विकास निर्देशांकात आघाडीवर होता. जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार दरडोई उत्पन्नात देखील कुवेत जगात चौथ्या स्थानी आहे. एक कुवेती दिनार म्हणजे २२४ भारतीय रुपयांच्या बरोबरीचा आहे.

सहावे सर्वात मोठे तेल भांडार
- कुवेतमध्ये जगातील सर्वात मोठा तेलसाठा आहे. देशात पहिल्यांदा १९३८ मध्ये तेलसाठा सापडला होता.
- १९४६ ते १९८२ पर्यंत येथे मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरण झाले. १९८० च्या दशकात सर्वात मोठी आर्थिक उलाढाल झाली.
- १९९० मध्ये इराकने हल्ला करून त्यावर कब्जा केला. १९९१ मध्ये आघाडीच्या सैन्याने त्यास बंधमुक्त केले.
बातम्या आणखी आहेत...