आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kyrgyzstan Key Part Of Indias Central Asia Vision Says Pm Modi

भारत-किर्गिस्तान सरकारचे दहशतवादाविरुद्ध एकमत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे रविवारी अनावरण झाल्यानंतर अभिवादन करताना मोदी आणि त्यांचे समकक्ष सारीयेव्ह. - Divya Marathi
महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे रविवारी अनावरण झाल्यानंतर अभिवादन करताना मोदी आणि त्यांचे समकक्ष सारीयेव्ह.
बिस्केक - आशियातील सहा देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी रात्री किर्गिस्तानला पोहोचले. राष्ट्रपती अल्मेझबेक अतमबेयू यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत कट्टरवाद व दहशतवादाविरुद्ध लढण्याच्या मुद्यावर एकमत असल्याचे सांगून शांतता व सुरक्षिततेबाबत विस्तृत चर्चा झाल्याचे स्पष्ट केले.

मोदी म्हणाले, मध्य आशिया हा भाग भारताच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर परस्परांच्या आर्थिक विकासाला हे देश बळ देऊ शकतात. दोन्ही देशांसाठी पायाभूत क्षेत्रातील विकास महत्त्वाचा असल्याचेही ते म्हणाले. दोन्ही नेत्यांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, जागतिक दहशतवाद व इतर गुन्हेगारीशी लढण्यासाठी लवकरच एक करार करण्याबाबत दोघेही सकारात्मक आहेत. बिस्केक व दिल्ली अशी थेट विमानसेवा सुरू झाल्याबद्दल दोन्ही देशांनी स्वागत केले. व्यापार आणि पर्यटन क्षेत्रातही सहकार्यावर दोन्ही देशांची सहमती असल्याचे पत्रकात नमूद आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे म्हणून दिलेल्या पाठिंब्याबद्दल मोदी यांनी किर्गिस्तानच्या राष्ट्रपतींचे आभार मानले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यप्रणालीत आवश्यक सुधारणा करण्याच्या कामी पण किर्गिस्तानची मदत लागेल, असेही ते म्हणाले.

ईईयूशी मुक्त व्यापाराची आशा
किर्गिस्तान आता युरेशिया इकॉनॉमिक युनियनमध्ये (ईईयू) सहभागी झाला आहे. याबद्दल शुभेच्छा देताना मोदी यांनी ईईयूच्या सदस्य देशांशी मुक्त व्यापार करार करण्याची इच्छा बोलून दाखवले.
पंतप्रधान मोदींनी याबाबत दिला शब्द
१. मध्य आशियातील या भागात लवकरच टेलि-मेडिसिन लिंक सुरू करणार.
२. किर्गि-इंडियान माऊंटन बायो-मेडिकल रिसर्च सेंटरच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू करणार.
३. किर्गिस्तानसाठी क्षमता वृद्धी आणि प्रशिक्षण वाढवणार.
४. बिस्केकमधील इंडिया-किर्गि माहिती-तंत्रज्ञान केंद्राच्या धर्तीवर इतर मोठ्या शहरांतही केंद्र स्थापन करणार.
५. कृषि प्रक्रिया उद्योग, ग्रीनहाऊस तंत्रज्ञान, जल संरक्षण आणि कृषि संशोधनासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांतही दोन्ही देशांचा सहकार्याचा प्रस्ताव.
असे आहेत चार करार
{संरक्षण सहकार्य : संरक्षण, लष्करी प्रशिक्षण आणि संयुक्त लष्करी सरावासह अनुभव-माहितीची देवाणघेवाण. लष्करी प्रशिक्षक व पर्यवेक्षकांचीही परस्परांना मदत.
{निवडणुकीत सहकार्य : दोन्ही देशांच्या निवडणूक आयोगांतही करार करण्यात आला. निवडणुकीशी संबंधित कायदे, जनमत, आधुनिक यंत्रणा आणि तंत्रज्ञान, निवडणूक प्रक्रियेसह इतर माहितीची देवाण-घेवाण.
{मानकांबाबत सहकार्य : किर्गिस्तानच्या िवत्त मंत्रालयाने भारतीय मानक ब्युरोशी एक करार केला. यानुसार, आपसांतील व्यापारात आवश्यक माहितीची देवाण-घेवाण होईल.
{सांस्कृतिक सहकार्य : सांस्कृतिक वारशांचे जतन, लोककला, युवा महोत्सव आणि साहित्यांचा अनुवाद तसेच क्रीडा क्षेत्रातही दोन्ही देश सहकार्य वाढवणार.