आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वीडनमध्ये कचऱ्याची कमतरता, आयात अपरिहार्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टॉकहोम : आपण देशात स्वच्छता अभियान सुरू केले आहे. मात्र युरोपात असा एक देश आहे ज्याला दुसऱ्या देशांतून कचरा आयात करावा लागतो. स्वीडनला वीजनिर्मितीसाठी कचऱ्याची आयात करावी लागते. येथे विजेच्या एकूण गरजेपैकी ५०% पेक्षा अधिक वीज कचऱ्याच्या रिसायकलिंगद्वारे निर्माण केली जाते. त्यामुळे या देशात कचऱ्याचा अभाव आहे.

१९९१ पासून स्वीडनमध्ये जैविक इंधनाच्या वापरावर जबर कर लादला आहे. जैविक इंधनाऐवजी येथे कचऱ्याच्या रिसायकलिंगद्वारे वीज निर्मिती केली जाते. ही प्रणाली अत्यंत आधुनिक स्वरूपाची असून घरात निर्माण झालेला केवळ १% कचराच इतरत्र फेकला जातो. मात्र आता या देशाला कचऱ्याची गरज आहे. इतर देशातून कचरा आयात करण्याची वेळ येथे आली आहे. आपले प्रकल्प अविरत सुरू राहण्यासाठी त्यांनी कचरा आयातीचा मार्ग अवलंबला.

स्वीडनची कचरा व्यवस्थापन करणारी कंपनी अवफाल वेरिजेने ही माहिती दिली. कंपनीच्या प्रवक्त्या अॅना केरीन ग्रिपवेल यांनी सांगितले की, स्वीडीश लोक निसर्ग संवर्धनाविषयी प्रचंड जागरूक आहेत. पर्यावरण संवर्धनासाठीची धोरणे कडक असून हा मार्ग योग्य असल्याची जाणीव आम्हाला आहे. कचरा बाहेर फेकला जाऊ नये यासाठी जनजागर सतत सुरू असतो. त्यामुळे रिसायकलिंग प्रकल्पांना अधिकाधिक पुरवठा केला जावा.
स्वीडनची रिसायकलिंग पॉलिसी मजबूत आहे. या अंतर्गत खासगी कंपन्या कचरा निर्यात आणि ते जाळण्याचे काम करतात. त्यातून निर्माण झालेली ऊर्जा नॅशनल हीटिंग नेटवर्कमध्ये जाते. कडाक्याची थंडी असेल तेव्हाही हा प्रकल्प सुरू राहतो व घरोघरी वीजपुरवठा करता येतो. स्वीडन सध्या ब्रिटनहून कचरा मागवत आहे.
विदेशातून कचरा मागवण्याविषयी ग्रिपवेल सांगतात, ही स्थिती तात्पुरती आहे. युरोपियन युनियनमधील देशांनी कचरा टाकण्यावर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे सर्व कचरा प्रकल्पाला पोहाेचता होईल. इतर देशांनी रिसायकलिंग प्रकल्प उभारले तर मात्र ही आयात थांबेल. त्यासाठी त्यांना डिस्ट्रिक्ट हीटिंग वा कूलिंग सिस्टिम उभारावी लागेल.
रस्तामार्गे नव्हे , भूमिगत कंटेनरद्वारे कचरा वाहतूक
स्वीडनने महानगरपालिका स्तरावर कचरा संकलनाची प्रणाली निर्माण केली आहे. याद्वारे कचरा घरातून रेसिडेंशियल ब्लॉकपर्यंत पोहाेचवला जातो. भूमिगत कंटेनर, ऑटोमेटेड व्हॅक्यूम सिस्टिमच्या माध्यमातून रिसायकल प्रकल्पापर्यंत पोहाेचता होतो. त्यामुळे वाहतूक खर्च वाचतो. रस्त्यावर दुर्गंधी येत नाही. स्वीडनच नाही तर संपूर्ण युरोपने रिसायकलिंगची संयुक्त नीती बनवली आहे. २०२० पर्यंत ५०% आणि २०३० पर्यंत ६५% कचरा रिसायकल होईल.
बातम्या आणखी आहेत...