Home »International »Other Country» Lahore Court Says Will Leave Hafiz Seed If Evidence Not Provided

ठोस पुरावे न दिल्यास हाफिजची सुटका करू, कोर्टाचा इशारा; जानेवारीपासून घरात स्थानबद्ध

मुंबईतील बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या विरोधातील पुरावे न दिल्यास त्याची सुटका केली जाईल,

वृत्तसंस्था | Oct 12, 2017, 03:58 AM IST

  • ठोस पुरावे न दिल्यास हाफिजची सुटका करू, कोर्टाचा इशारा; जानेवारीपासून घरात स्थानबद्ध
लाहोर -मुंबईतील बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या विरोधातील पुरावे न दिल्यास त्याची सुटका केली जाईल, असा इशारा पाकिस्तानच्या लाहोर न्यायालयाने दिला आहे. जमात-उद-दावाचा म्होरक्या सईद ३१ जानेवारीपासून घरात स्थानबद्ध आहे.

लाहोर उच्च न्यायालयात सईदच्या स्थानबद्धतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी नुकतीच झाली. त्यात काेर्टाने गृह खात्यावर ताशेरे आेढले आहेत. कोर्टासमोर सर्व पुराव्यांसह हजर होणे अपेक्षित असताना नियोजित वेळेत गृह खात्याकडून कोणीही उपस्थित राहिले नसल्यावरून खरडपट्टी काढली. सकृद्दर्शनी तर याचिकाकर्त्याच्या विरोधात कोणताही सबळ पुरावा दिसून आलेला नाही. सरकारने त्यास स्थानबद्ध केलेले असल्यास त्याच्या विरोधातील पुरावे सादर करणे बंधनकारक आहे. अन्यथा त्याची पुराव्यांअभावी सुटका केली जाऊ शकते, असे न्यायमूर्ती सईद मजहर अली अकबर नक्वी यांनी स्पष्ट केले. प्रकरणाची पुढील सुनावणी १३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. एखाद्या व्यक्तीला पुराव्याअभावी अटक किंवा स्थानबद्ध केले जाऊ शकत नाही, असा दावा सईदचे वकील ए. के. डोगर यांनी कोर्टात केला.

एक कोटी डॉलर्सचे सईदवर बक्षीस :अमेरिकेने सईदवर १ कोटी डॉलर्सचे बक्षीस ठेवले आहे. अनेक दहशतवादी घटनांत सईदचा हात आहे. सईदबाबतचे वास्तव भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर समोर आणल्यानंतर हे प्रकरण जड जाणार, असा तर्क लढवत पाकिस्तानने त्यास आधीच स्थानबद्ध केले होते. दहशतवादी कारवायांच्या विरोधात सरकार कारवाई करत असल्याचे पाकने दाखवून दिले होते.

Next Article

Recommended