आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानची 'बदनाम' हिरा मंडी, हा आहे लाहोरचा रेड लाईट एरिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा भाग कधीकाळी या भागाचे नाक होते. - Divya Marathi
हा भाग कधीकाळी या भागाचे नाक होते.
पाकिस्तानच्या लाहोर शहरात एक मंडी आहे. नाव आहे 'हिरा मंडी'. हा भाग कधीकाळी या भागाची शान होती. मात्र आज ती बदनाम आहे. बदनाम आहे वेश्‍या व्यवसायासाठी. रात्र होताच हा भाग फुलतो आणि चारी बाजूने दलाल व सेक्स वर्कर्सला शोधताना ग्राहक दिसतात. नाइलाज म्हणून हे काम करणा-या महिलांव्यतिरिक्त असे अनेक कुटुंबे आहेत जे या व्यवसायात गुंतले आहेत. असे पडले हिरा मंडी नाव...
- या भागात कधीकाळी शीख राजा राज्य करत होते.
- यापैकी एक होते रंजित सिंह. त्यांच्या न्यायालयात एका मंत्र्यांचा हिरा सिंह नावाचा मुलगा होता.
- हा भाग त्याच्याच नावाने वसवले होते. नंतर याला हिरा मंडी म्हटले जाऊ लागले.
- हिरा सिंह शेर सिंहच्या न्यायालयात स्वत: ही मंत्री होते.
कधीकाळी शान असायची हिरा मंडी
- हिरा मंडी कधी समृध्‍द, संस्कृती आणि आदर आतिथ्‍यसाठी प्रसिध्‍द होते.
- उर्दू भाषा व वाड्.मय लोकप्रिय करण्‍यात नाच गाणे करणा-यांची मोठी भूमिका होती.
- मुगल काळात या भागात नाचगाणे (तवायफ ) करणारे राहत होते. ते संगीत, गायन आणि नृत्याचे उच्च संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करत होते.
- भविष्‍यातील राज्यकर्त्यांच्या काळजीसाठी या भागात पाठवले जात होते.
- जुन्या लाहोरमध्‍ये हिरामंडी व्यतिरिक्त रोशनाई गेट, बादशाही मशिद, लाहोर न्यायालय आणि हुजुरी बाग आहे.
ब्रिटिश काळात झाला बदल
- ब्रिटिश शासनकाळात या भागांचा कायापालट झाला.
- ब्रिटिशांनी नाचगाणे करणा-यांना वेश्‍या असे नाव दिले. यानंतर हा भाग बदनाम होत गेला.
- वास्तविक ब्रिटिश आर्मीचे जवानांच्या मनोरंजनासाठी येथे येऊ लागले.
- त्यांनी नाचगाणे करणा-यांना वेश्‍या होण्‍यास भाग पाडले.
तवायफ नावाचे अभिमान वाटते अनेक मुलींना
- येथे असे अनेक महिला आहे ज्या केवळ मुजरा करतात. त्यांना तवायफ असे म्हणतात.
- त्यांच्या दाव्यानुसार त्या वेश्‍याच्या नरकात उतरलेल्या नाहीत.
- या अशा महिला आहेत, ज्यांचे कुटुंबे शतकांपासून हे काम करत आहेत.
- त्यांचे म्हणणे आहे, की रात्री 11-1 दरम्यान मुजरा करतात. त्यांना तवायफ म्हणणे अभिमान वाटते.
- त्या वेश्‍याव्यवसायाला विरोध करतात.
पुढील स्लाइड्सवर पाहा हिरामंडीचे छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...