आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लखवीचे व्हॉइस सॅम्पल हा पुरावा नाही : पाक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - मुंबई हल्ला प्रकरणात चार वर्षांच्या प्रयत्नानंतर पाकिस्तानच्या फेडरल इन्स्टिगेशन एजन्सीने (एफआयए)भारताला जोरदार झटका दिला आहे. पाकने म्हटले आहे की मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड जकी - उर रहमान लखवीच्या आवाजाचे नमुने (व्हॉइस सॅम्पल) पुरावा म्हणून वापर करता येणार नाही. कारण याची पुष्टी करू शकेल असा कायदाच पाकिस्तानात अस्तित्वात नाही.
पाकिस्तानचे प्रमुख दैनिक डॉन न्यूजने एफआयएचे विशेष वकील मोहम्मद अजहर चौधरी यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, भारतीय गुप्तचर एजन्सीने कथितरित्या जे ऑडिओ रेकॉडिंग केले आहे त्याची तपासकामात मदत होऊ शकेल. परंतु पुरावा म्हणून ते सादर करता येणार नाही. इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या वापराची परवागी पाकिस्तानी कायद्यात नाही. एखाद्या आरोपीला त्याच्या आवाजाचे नमुने देण्यासाठी कायद्याने बाध्य करता येत नाही.
तसा कायदा भारतात अमेरिकेतही नाही. त्यामुळे आम्ही लखवी किंवा अन्य कुणालाच आवाजाची चाचणी देण्यास बाध्य करू शकत नाही.
बातम्या आणखी आहेत...