आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lakhvis Release Is Detrimental To Regional Security

लख्वीच्या सुटकेमुळे आशियाची सुरक्षा धोक्यात : अमेरिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - मुंबईवरील२६ /११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड कुख्यात दहशतवादी जकी उर रहमान लख्वी याच्या सुटकेमुळे भारताच्या या दाव्याला बळ मिळते की, पाकिस्तान दहशतवादाला पाठीशी घालत आहे. याचा परिणाम भारत - अमेरिका द्विपक्षीय संबंधांवरही होऊ शकतो. तथापि अमेरिकेचे म्हणणे असे आहे की पाकिस्तान दहशतवादाच्या विरोधात कठोर पावले उचलत आहे. अमेरिकेचे सुरक्षा तज्ज्ञ व्हिटनी कॅसल यांनी फाॅरेन पाऊलिसी या प्रतिष्ठीत नियतकालिकात लिहिलेल्या एका लेखात हे मत व्यक्त केले आहे.
कॅसल यांनी लेखात म्हटले आहे की लखवीच्या सुटकेमुळे केवळ भारत - पाकिस्तान संबंधच बिघडणार असे नव्हे तर अमेरिका-भारत संबंधही त्यापासून अलिप्त राहू शकत नाहीत. दोन्ही देश परस्पर संबंध बळकट करण्याच्या प्रयत्नात आहेत. पण त्यात हा वाद अडसर ठरू शकतो. कॅसल यांनी म्हटले की, लख्वीच्या सुटकेमुळे भारत नाराज आहे.

अमेरिकन सरकारनेही या निर्णयावर टीका केली होती. दहशतवादी जकी उर रहमान लखवी (५५) याची सुटका करण्याचे आदेश लाहोर उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार त्याची १० एप्रिल रोजी सुटका करण्यात आली आहे. कॅसल हे न्यूयॉर्कमधील एका खासगी गुप्तचर कंपनी "द अर्किन' समुहाचे रणनीती विश्लेषक जोखिम व्यवस्थापन विभागाचे संचालक आहेत. त्यांनी पुढे म्हटले आहे की, पाकिस्तानचे भारत अथवा अमेरिकेसोबतचे िबघडते संबंध क्षेत्रीय तसेच जागतिक सुरक्षेसाठी नुकसानदायक आहेत. भारत - पाक द्विपक्षीय संबंधांसंदर्भात तर ते नुकसानदायक आहेतच. लखवीच्या सुटकेमुळे निराशा निर्माण झाली आहे. परंतु अनेक भारतीयांसाठी ही बातमी अनपेक्षित नव्हती. अमेरिकेने पाकसोबत ९५.२० कोटी डॉलरच्या हेलिकॉप्टर क्षेपणास्त्र विक्रीच्या सौद्याला मंजुरी दिली आहे. परंतु लखवीच्या सुटकेनंतर अमेरिकेने पाकिस्तानला लष्करी मदत पुरवणे बंद करावे, अशी मागणी जोर धरत आहे.