आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललित मोदी यांचे प्रिन्स चार्ल्स यांच्याशी संबंध, काळा पैसा पांढरा करण्यासाठी NGOला देणगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांनी आपल्याकडचा काळा पैसा धर्मादाय संस्थेला दान दिल्याचे प्रकरण उघडकीस आले असून त्यांच्या विरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी झाले आहे. ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांच्या संस्थेला भारतातील हत्तींचे संरक्षणासाठी मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यामध्ये मोदी यांनी तब्‍बल 30,000 डॉलर ( 19.14 लाख रुपये) देणगी दिली होती.

काळा पैसा पांढरा करण्यासाठी अशा प्रकारची कृती केल्याचा आरोप मात्र मोदी यांनी फेटाळून लावला आहे. चार्ल्स यांच्या एलिफंट फॅमिली चॅरिटीला मोदी यांनी सुमारे ३० हजार डॉलर्सची रक्कम दान दिली होती, असा दावा ‘संडे टाइम्स’ ने केला आहे. चार्ल्स आणि त्यांची पत्नी तथा डचेस ऑप कॉर्नवॉल कॅमिला यांच्याकडे गेल्या वर्षी या चॅरिटीच्या अध्यक्षपद आले. ही संस्था कॅमिला यांचे दिवंगत बंधू मार्क शांड यांनी स्थापन केली होती. आशियातील दुर्मिळ होत असलेल्या हत्तींच्या प्रजातीचे संरक्षणासाठी ही संस्था कार्यरत आहे. हत्तींच्या संवर्धनासाठी संस्थेच्या वतीने वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. ऑक्टोबर २०११ मध्ये मोदी यांनी चॅरिटीला ३० हजार डॉलर्स एवढी रक्कम दिली होती, असा दावा वृत्तपत्राने केला आहे.
आरोप निराधार
भारतात माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपांना कसलाही आधार नाही. त्यामागे केवळ राजकारण आहे, असे ललित मोदी यांनी स्पष्ट केले. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचेही नाव ललितगेट प्रकरणात घेतले जाते.