आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lalit Modi Partied With Paris Hilton After Help From Sushma Swaraj

ललित मोदींनी क्युबामध्ये पॅरिस हिल्टन, नाओमी कैम्पबेलबरोबर केल्या पार्ट्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हवानामध्ये पॅरिस हिल्टनबरोबरचा ललित मोदी यांचा इन्स्टाग्रामवरील फोटो. - Divya Marathi
हवानामध्ये पॅरिस हिल्टनबरोबरचा ललित मोदी यांचा इन्स्टाग्रामवरील फोटो.
ललित मोदींना लंडनहून पोर्तुगालला जाण्याची परवानगी दिल्यास दोन्ही देशांच्या संबंधांवर परिणाम होणार नसल्याचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी गेल्या वर्षी जुलै महिन्यात ब्रिटिश उच्चायुक्तांना सांगितले होते. त्यावरून रविवारी मोठा वाद उभा राहिला होता. 700 कोटी रुपयांच्या मनी लौंडरींगचा आरोपी परराष्ट्र मंत्र्यांकडे थेट मदत कशी मागू शकतो, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात येत होता.

या प्रकरणी सरकार बॅकफूटवर आल्यानंतर सुषमा यांनी ट्विट केले की, पत्नीच्या सर्जरीनंतर ललित मोदी लंडनला परतले. मग मी काय बदल केला ? पण ललित मोदींच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटवरून हे लक्षात येते की ते फक्त लंडनमध्येच राहिले नाही. गेल्यावर्षी ऑगस्ट ते यंदाच्या जूनदरम्यान ललित मोदींनी 8 देशांचे दौरे केले. तेवढेच नाही तर अमेरिकन सेलिब्रिटी पॅरिस हिल्टन आणि ब्रिटिश मॉडेल नाओमी कॅम्पबेलबरोबर त्यांनी क्युबामध्ये पार्ट्याही केल्या. ते वरचेवर लंडनला येत असतात. तसेच क्युबा आणि इटलीलाही ते दोनपेक्षा अधिकवेळा गेल्याचे स्पष्ट होते.

पत्नीच्या उपचारासाठी मिळाली परवानगी...
ललित मोदी यांच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटनुसार ते 45 आठवड्यांपूर्वी पोर्तुगालमध्ये होते. त्यावेळी 4 वर्ष 2 महिन्यांनी त्यांना परदेश दौऱ्यावर जाण्याची परवानगी मिळाली. त्यांची पत्नी मीनल मोदी यांची कँसर सर्जरी होती आणि मोदींनी लेटर ऑफ कंसेंटवर सही करण्यासाठी जायचे होते. मोदींना सुषमा स्वराज यांच्या मदतीने ब्रिटन सरकारकडून या दौऱ्यासाठी परवानगी मिळाली होती. सुषमा यांनी स्वतः रविवारी ट्विटरवर त्याला दुजोरा दिला आहे.

हिल्टन-कॅम्पबेल बरोबर पार्टी, शाहरुख-दीपिकाला भेटले
ललित मोदी यांनी सुमारे 4 महिन्यांपूर्वी क्युबामध्ये पॅरिस हिल्टन आणि नाओमी कॅम्पबेलबरोबर पार्टी केली. तर दुबईत ‘हॅप्पी न्यू ईअर’ च्या इव्हेंटमध्येही ते सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी शाहरुख दीपिकाबरोबर फोटोही काढले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, ललित मोदींच्या वर्षभरातील दौऱ्यांचे फोटो...