आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललित मोदीने व्हिसासाठी ब्रिटिश राजघराण्‍याच्या व्यक्तींच्या नावांचा केला वापर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - भ्रष्‍टाचाराचा आरोपी आणि देशातून पळून गेलेले पूर्व आयपीएल प्रमुख लल‍ित मोदी व्हिसा प्रकरणाने एक वेगळे वळण घेतले आहे. माध्‍यमांच्या अहवालानुसार, ब्रिटनच्या गृह मंत्रालयाकडून प्रवासा करिता आवश्‍यक असलेली कागदपत्रे मिळावे यासाठी ब्रिटिश राजघराण्‍यातील नावांचा वापर केला होता. यात राजकुमार चार्ल्स आणि त्यांचे भाऊ अँड्र्यू यांचाही समावेश आहे. राणी एलिझाबेथ द्वितीय आणि मुलगा अँड्र्यू आणि मोदी एकमेंकांना खूप दिवसांपासून ओळखतात, असे 'द संडे टाइम्स'च्या वृत्ता म्हटले आहे. वृत्तानुसार जुलै 2014 मध्‍ये प्रवाशी कागद पत्रे मिळण्‍यापूर्वी लंडनमधील मोदींच्या घरी अँड्र्यू भेटले होते. दोघांमधील चर्चेचे तपशीलाबाबत बकिंगहॅम पॅलेसने कोणतेही भाष्‍य करण्‍यास नकार दिला.
ब्रिटिश वर्तपत्राने परराष्‍ट्र मंत्री सुषमा स्वराजने मोदीला मदत केल्याचे वृत्त दिल्याने भारतात मोठ्या प्रमाणावर राजकीय नाट्य रंगले आहे. माणुसकीच्या पातळीवर मोदीला मदत केल्याचे स्वराज यांनी मान्य केले आहे. विरोध पक्षांनी परराष्‍ट्र मंत्रीच्या राजनाम्याची मागणी केली आहे. या सर्व प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगले आहे. 2010 मध्‍ये आयपीएल सामना फ‍िक्सिंग आणि सट्टेबाजीचा आरोप झाल्याने ललित मोदी लंडनला पळून गेले. स्वत:वरील सर्व आरोप ते नाकारत आले आहेत. ब्रिटनमध्‍ये जाण्‍याचे कारण त्याने आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले आहे.