काठमांडू - नेपाळवर गुरुवारी पुन्हा एकदा नैसर्गिक संकट कोसळले. मुसळधार पावसानंतर भूस्खलन, दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत किमान २५ जणांचा मृत्यू झाला तर १३ जखमी झाले. अनेक घरे भुईसपाट झाली. कास जिल्ह्यातील घटनेत १९ जणांचा मृत्यू झाला. ही घटना काठमांडूपासून अडीचशे किलो मीटर अंतरावर घडली. काठमांडूच्या पश्चिमेकडील पोखरा पर्यटनस्थळाला वादळी पावसाचा तडाखा बसला असून पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. मृतांमध्ये ११ महिला आणि ८ पुरुषांचा समावेश आहे.