आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US : 100 Km अंतरावरून क्षेपणास्त्र उध्वस्त करणाऱ्या युद्धनौकेची चाचणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यूएसएस जुमवॉल्ट हे 'स्टील्थ' डिस्ट्रॉयर आहे. याचे डिझाइन हे युनिक अँग्युलर आहे. हे जहाड रडारवर दिसू नये म्हणून तसे करण्यात आले आहे. - Divya Marathi
यूएसएस जुमवॉल्ट हे 'स्टील्थ' डिस्ट्रॉयर आहे. याचे डिझाइन हे युनिक अँग्युलर आहे. हे जहाड रडारवर दिसू नये म्हणून तसे करण्यात आले आहे.
बाथ (अमेरिका) : यूएस नेव्हीसाठी तयार करण्यात आलेली सर्वात मोठी गाइडेड मिसाइल डीस्ट्रॉयर युद्धनौका 'यूएसएस जुमवाॅल्ट' ची चाणी सुरू झाली आहे. अमेरिकेच्या या सर्वात मोठ्या स्टील्थ (शत्रूच्या रडारवर न दिसणाऱ्या) मिसाइल डीस्ट्रॉयरद्वारे सुमारे 100 किलोमीटरच्या अंतरावरूनच शत्रूचे मिसाइल्स उध्वस्त करता येऊ शकतात.

पुढील वर्षी ताफ्यात होणार समावेश
- ट्रायल दरम्यान इंजिनिअर्स कॉम्प्युटर आणि पॉवर सिस्टीम चेक करत आहेत. त्याशिवाय परफॉरर्मेंस टेस्टही होणार आहे. गरजेनुसार यात बदल केले जाणार आहेत.
- पुढच्या वर्षी यूएस नेव्हीच्या ताफ्यात याचा समावेश केला जाणार आहे. याच्या निर्मितीसाठी अंदाजे 4.4 अब्ज डॉलर (सुमारे 28,000 कोटी रुपये) खर्च आला आहे.
- रिपोर्टनुसार 'जुमवाॅल्ट' सारख्याच आणखी दोन युद्धनौका तयार केल्या जाणार आहेत.

वैशिष्ट्ये...
- याला युनिक अँग्युलर डिझाइन देण्यात आले आहे. त्यामुळे ते शत्रूच्या रडारवर दिसणार नाही.
- हे जहाज 610 फूट लांब आणि 15,000 टन वजनाचे आहे. त्याचा जास्तीत जास्त वेग ताशी 35 मैल सुमारे (56 किमी) आहे.
- 'बाथ आयरन वर्क्स' (बीआयडब्ल्यू) ने याची निर्मिती केली आहे. हे अमेरिकेतील प्रमुख शिपयार्ड आहे.
- यूएस नेव्हीमध्ये असलेल्या डिस्ट्रॉयरच्या तुलनेत हे 100 फूट लांब आणि 20 फूट रूंद आहे. याच्या निर्मितीसाठी सुमारे चार वर्षांचा कालावधी लागला आहे.

शस्त्रांनी सज्ज
- ही युद्धनौका सी स्पॅरो आणि टॉमहॉक मिसाइलसारख्या शस्त्रांनी सज्ज आहे. त्याशिवाय अँटी सबमरीन रॉकेट वर्टिकली लाँच करू शकते.
- यातील 'कॉम्प्युटर गाइडेड मिसाइल सिस्टीम' टार्गेटला 63 मैल (सुमारे 102 किमी) अंतरावरून लक्ष्य करू शकते.
- त्याशिवाय अॅडव्हान्स्ड गन सिस्टीमही आहे. रिपोर्ट्सनुसार, यात लेझर वेपन किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेल गनही जोडता येते.

यांच्या नावावर दिले नाव
- जहाजाला अमेरिकेचे अॅडमिरल अॅल्मो रसेल जुमवॉल्ट यांचे नाव देण्यात आले आहे.
- अॅल्मो रसेल हे सर्वात कमी वयाचे नेव्हल ऑपरेशन्स चीफ होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, डिस्ट्रॉयरचे PHOTOS
बातम्या आणखी आहेत...