आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: लास वेगास शूटरचे दार तोडले, मृतदेहासह सापडल्या 23 बंदूका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रुममध्ये सर्वत्र रायफल पसरल्या होत्या... - Divya Marathi
रुममध्ये सर्वत्र रायफल पसरल्या होत्या...
इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेत 2001 च्या दहशतवादी हल्ल्यानंतरचा सर्वात मोठा नरसंहार करणारा लास वेगास शूटिंगचा आरोपी स्टीफन पॅडॉकची हॉटेलमधील ती खोली पोलिसांनी लाथ मारून उघडली. याच 32 व्या मजल्याच्या खोलीतून त्याने गोळीबार केला आणि पोलिसांच्या जबाबी कारवाईत ठार झाला. त्याच्या रूममध्ये पोलिसांना त्याच्या मृतदेहासह तब्बल 23 मशीनगन सापडल्या आहेत. त्यामध्ये एक-47 सह, एआर-15 आणि डीडीएम-4 अशा अत्याधुनिक रायफलींचा समावेश आहे. मरण्यापूर्वी त्याने फिलिपाइन्सच्या एका बँक खात्यात 1 लाख डॉलर वळते केले होते. त्याने हॉटेलात स्वतःचे कॅमेरे सुद्धा लावले होते.
 

पॅडॉकने म्युजिक कॉन्सर्ट सुरू असताना हॉटेलच्या 32 व्या मजल्यावरून अचानक गर्दीवर गोळीबार केला. 9 ते 11 मिनिटे सुरू असलेल्या या गोळीबारात 59 जणांचा मृत्यू झाला. तसेच 500 हून अधिक नागरिक जखमी झाले. जगातील सर्वात कुख्यात दहशतवादी संघटना इसिसने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. मात्र, अमेरिकेची संघीय तपास संस्था एफबीआयने या हल्ल्याचे दहशतवादी कनेक्शन फेटाळून लावले आहे. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, हल्लेखोराच्या खोलीतील आणि घटनास्थळाचे चित्र...
बातम्या आणखी आहेत...