आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lashkar A Toyba Against To Take Stringent Action Keri

लष्कर-ए-तोयबाविरुद्ध कठोर कारवाई करा : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅन होजे- अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी लष्कर-ए-तोयबाविरुद्ध कठोर कारवाईची
मागणी केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यासमोर केरींनी हा भूमिकावजा आदेश दिला.

लष्कर ए-तोयबाचे संपूर्ण नेटवर्क पाकिस्तानातून संचालित होते. पाक सरकारने या दहशतवादी गटावर थेट कारवाई करावी. अफगाणिस्तानातील हक्कानी नेटवर्क संपुष्टात आणण्यासाठीही पाकिस्तानने आश्वासन दिले होते, याची आठवण केरी यांनी या वेळी करून दिली.

संयुक्त राष्ट्र आमसभेदरम्यान शरीफ-केरी चर्चा झाली. आर्थिक विकास व स्थैर्यासाठी भारत-पाक प्रत्यक्ष वाटाघाटींची गरज असल्याचेही केरी या वेळी म्हणाले.