आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पुतीन यांच्या मुलीला सून करण्याची इच्छा’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्रिपोली - लिबियाचे दिवंगत हुकूमशहा मुअम्मर गद्दाफी यांना आपल्या मुलाचा विवाह रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या मुलीशी व्हावा, असे वाटत होते. जेणेकरून लिबिया आणि रशिया यांच्यातील संबंध आणखी दृढ होतील, असा त्यांचा हेतू होता.

गद्दाफी यांचे माजी सल्लागार मोहंमद अब्द अल मुतालिब अल-हौनी यांनी हा दावा केला आहे. गद्दाफी यांनी याबाबत पुतीन यांच्याशी चर्चा केली होती. त्यांनी आपला दुसरा मुलगा सैफ अल-इस्लामला पुतीनचा जावई करण्याचा प्रस्ताव ठेवला होता; परंतु माझी मुलगी तुमचा मुलगा सैफ अल इस्लामला आेळखत नाही, असे सांगून पुतीन यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. गद्दाफी यांना नंतर पद सोडावे लागले आणि २०११ मध्ये नाटोच्या विरोधातील बंडामध्ये त्यांना ठार करण्यात आले होते. त्यानंतर जुलैमध्ये सैफला त्रिपाेलीच्या कोर्टाने मृत्युदंड ठोठावला.
बातम्या आणखी आहेत...