आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेट विमानाचे तंत्रज्ञान घेईल मानवी आरोग्याची काळजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- जेट विमानाच्या इंजिनामध्ये खूप गुंतागुंत असते. त्यात शेकडो उपकरणांचा समावेश असतो. विमानात काही बिघाड झाल्यास ते अपघातग्रस्त होऊ शकते आणि त्यातील शेकडो प्रवाशांचा जीव जाऊ शकतो.

जेट विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्यास त्याची दुरुस्ती आदर्श पद्धती समजली जात नाही. इंजिन ठिकठाक करण्याइतपत वेळही नसतो. अशा स्थितीत जीव वाचवण्यासाठी विमानाच्या इंजिनमध्ये सेन्सर लावलेले असतात. सेन्सर जेट विमानावर कायम निगराणी करत असतात आणि कोणत्याही अप्रिय स्थितीत कॉकपिटला सर्वात पहिल्यांदा माहिती दिली जाते. गुंतागुंतीची समस्या उद््भवण्याआधी ही माहिती उपलब्ध होते.

ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाचे तज्ज्ञ आणि डिजिटल हेल्थ एक्स्पर्ट लियोनेल तारेसेंको यांच्या म्हणण्यानुसार, जेट विमानाच्या या तंत्रज्ञानाचा वापर माणसाचे आरोग्य आणि आरोग्य सेवा चांगल्या करण्यातही केला जाऊ शकतो. तारसेंको म्हणाले, विमानात सेन्सर कोणत्याही कठीण प्रसंगाची कल्पना देतात, तीच पद्धती अारोग्य विज्ञानात उपयोगात आणली जाऊ शकते.

तारेसेंको म्हणाले, जेट विमानाच्या तंत्रज्ञानाचा वापर हृदयविकाराच्या झटक्याच्या स्थितीत सामान्य माणसाला करता आल्यास रुग्णांचे प्राण वाचू शकतात.

जेट विमानातील सेन्सरच्या धर्तीवर रुग्णालयांत हार्ट रेट, बीपी, तापमान आणि रक्तपुरवठा आदींबाबतची सेन्सर उपकरणे दिसून येतात. डॉक्टर आणि परिचारिका या सर्व माहितीवर बारीक लक्ष ठेवून असतात. याच्याच साहाय्याने रुग्णांवर इलाज केला जातो. येत्या दहा वर्षांत लोक अशा प्रकारच्या सेन्सर्सचा वापर आपल्या घरातही करतील, अशी आशा तारसेंको यांनी व्यक्त केली. यामधील व्हिडिओ कॅमेरा तुमच्या प्रकृतीवर लक्ष ठेवेल. हे उपकरण हृदयाचे ठोके, रक्तदाब, तापमानवर लक्ष ठेवेल.