आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News Of Yemen Crisis And Saudi Arabia Air Strike

PHOTOS: हवाई हल्ले, कोसळलेल्या इमारती हा आहे येमेनमधील \'ऑंखो देखा हाल\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: येमेनची राजधानी सना येथील विमानतळावर झालेल्या हल्ल्यात मृतदेह जमिनीत गाडली गेले होते.
सना - येमेनमध्‍ये परिस्थिती बिघडत चालली आहे.एकीकडून सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली हवाई हल्ले चालू आहे.दुसरीकडे मुस्लिम हौती बंडखोरांनी तोडीसतोड देण्‍याची शपथ घेतली आहे. बंडखोर नेता अब्दुल मलेक अल-हौती म्हणाले, की महान येमेन नागरिकांनी कधी समर्पण करण्‍याचे शिकलेले नाही. आता पर्यंत 550 पेक्षा जास्त हौती बंडखोर मारली गेल्याचा सौदीने दावा केला आहे. यापूर्वी रविवारी संयुक्त राष्‍ट्राने येमेनमधील हल्ले बंद करण्‍याची विनंती केली होती. मात्र सौदीने विनंती फेटाळली आहे. हवाई हल्ल्यात आतापर्यंत 273 नागरिक मारली गेल्याचे सांगितले जात आहे. या व्यतिरिक्त सार्वजनिक संपत्तीचे अमाप नुकसान झाले आहे.
प्रकरण काय आहे ?
शिया मुस्लिम हौती बंडखोरांनी सप्टेंबर 2014 मध्‍ये येमेनची राजधानी सना नियंत्रण मिळवले होते. मार्च महिन्यात येमेनचे राष्‍ट्रपती अबेद रब्बो मन्सूर हादीला सत्तेतून हकालपट्टी केली.हादी आपला जीव वाचवून रियाधमध्‍ये आश्रय घेतला आहे. यानंतर 26 मार्च रोजी सौदी अरेबियाने बंडखोरांचा खात्मा करण्‍यासाठी येमेनवर हवाई हल्ले सुरु केले. या मोहिमेत इतर मुस्लिम देशही सहभागी आहेत.सौदीने इराण हौदी बंडखोरांना मदत करत असल्याचा आरोप केला आहे.
पुढे पाहा येमेनमधील सद्य:स्थिती...