आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हज यात्रेचे ताजे PHOTOS, याठिकाणी एका रात्रीसाठी टेंटचे भाडे आहे 2 लाख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मक्कामध्ये अराफत पर्वतावर जमलेले हज यात्रेकरू. - Divya Marathi
मक्कामध्ये अराफत पर्वतावर जमलेले हज यात्रेकरू.
मक्का - हज यात्रेसाठी जगभरातून हजारो मुस्लीम बांधव मक्कामध्ये आले आहेत. बुधवारी हज यात्रेकरू अराफात पर्वतावर पोहचू लागले आणि प्रार्थनेसाठी सूर्यास्तापर्यंत थांबले. मीनाहून हाजींना अराफतला पोहोचवण्यासाठी पहिली रेल्वे बुधवारी धावली. हज यात्रा संपेपर्यंत ही रेल्वे सेवा सुरू राहणार आहे. बहुतांश हाजी हे मीना शहराच्या बाहेर थांबलेले आहेत. याठिकाणी त्यांची व्यवस्था अत्याधुनिक अशा टेंटमध्ये करण्यात आली आहे. या टेंटचे एका रात्रीचे भाडे 2 लाख रुपये आहे.

सौदी अॅथॉरिटीजच्या अंदाजानुसार यावेळी सुमारे 20 लाख हज यात्रेकरू अराफतला येणार आहे. यापवित्र यात्रेदरम्यान सर्व हाजी एकसारखे पांढरे वस्त्र परिधान करतात. ते पवित्रतेचे प्रतिक मानले जाते. त्यात अगदी लगान मुलांपासून ते वयोवृद्धांचा समावेश आहे. सुमारे 1400 वर्षांपूर्वी याच अराफात पर्वतावर मोहम्मद पैगंबरांनी अखेरचा संदेश दिला होता, असे मानले जाते.

मीना शहराला छावणीचे रूप
सौदीमधील मीना शहराला छावणीचे स्वरुप आले आहे. सगळीकडे टेंट लावलेले दिसत आहेत. येथे हज यात्रेकरूंसाठी पोटाकेबीनचे दोन बाय दोन मीटरच्या रूम तयार करण्यात आल्या आहेत. त्यात दोन बेड आणि एक छोटे कॅबिनेच असते. त्यात एका रात्रीचे भाडे एका व्यक्तीसाठी 3500 डॉलर म्हणजे सुमारे 2 लाख रुपये आहे. यावर्षी येथे व्हीआयपी रूमही तयार करण्यात आल्या आहेत. त्याचे एका रात्रीचे भाडे 7 हजार डॉलर (4 लाख 61 हजार रुपये)आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, मक्का येथील हज यात्रेचे PHOTOS