आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्‍तर कोरियात आहेत असे क्रुर कायदे, नागरिक भोगताहेत नरक यातना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- उत्तर कोरिया व मलेशियाने परस्परांच्या नागरिकांना मायदेशी जाण्यास मज्जाव केला आहे. आता मलेशियातील उत्तर कोरियाचे नागरिक मलेशिया सोडू शकणार नाहीत आणि उत्तर कोरियातील मलेशियन नागरिकांना देश सोडता येणार नाही. मलेशियात उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांचे सावत्र भाऊ किम जाँग नाम यांच्या हत्येनंतर वेगवान घडामोडी घडू लागल्या आहेत. त्यातच दोन्ही देशांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. दोन्ही देशांनी परस्परांच्या राज दूतांना पहिल्यांदाच हाकलून लावले आहे. आधी होते मैत्रीपूर्ण संबंध...
 
- वास्तविक मलेशिया व उत्तर कोरियाचे संबंध अतिशय मैत्रीपूर्ण राहिले आहेत. १९७० च्या दशकापासून दोन्ही देशांत चांगले संबंध राहिले आहेत. 
- उत्तर कोरियाने २००३ मध्ये क्वालालंपूरमध्ये राजदूत कार्यालय सुरू केले होते. परंतु या वर्षी १३ फेब्रुवारी रोजी क्वालालम्पूर विमानतळावर किम जाँग नाम यांच्या हत्येनंतर उभय देशांत कटुता आली.
- मलेशियातील प्रसारमाध्यमांनी हत्येमागे उत्तर कोरियाच्या सरकारचा हात असल्याचा आरोप केला आहे. त्यावर उत्तर कोरियाने जोरदार टीका केली. 
- या प्रकरणात पकडण्यात आलेल्या आरोपीस उत्तर कोरियाला सोडून द्यावे लागले आहे. तपासात जाँग-नामला व्ही एक्स नर्व्ह एजंट हे विष देण्यात आले होते, असे निष्पन्न झाले होते. 
- हत्येप्रकरणी एका महिलेला अटक झाली होती. तिने हे कृत्य करण्यासाठी ९० डॉलर मिळाल्याची कबुली दिली होती. हा टीव्ही कार्यक्रमाचा भाग असल्याचे सांगितले गेल्याचा दावाही तिने केला होता.
- उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याच्यामुळे जगभरातील अनेक देश त्रस्त आहेत. आता पूर्व आशियातील देशही त्याच्यामुळे त्रस्त झाले आहेत.
- किम जोंगमुळे जगभरातील देशच नव्हे तर त्याच्या देशातील नागरिक सुद्धा कमालीचे त्रस्त आहेत. 
- आज या निमित्ताने आपण उत्तर कोरियातील कठोर कायद्याबाबत जे तेथील नागरिकांना भोगावे लागतात.
 
खूप क्रुर आहेत कायदे-
 
उ. कोरियामध्‍ये खूप कायदे आहेत. त्‍यामुळे इतर देशातील नागरिकांनी उत्‍तर कोरियातील नागरिकांविषयी सहानभूती वाटते.
 
पुढील स्‍लाईड्सवर वाचा, कठोर कायद्याबाबत....
बातम्या आणखी आहेत...