आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झुरळाला प्रतिष्ठा देण्यासाठी पुढाकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो- प्राणी हक्क संघटना व इतर पर्यावरण चळवळीत प्राण्यांचे सृष्टीतील महत्त्व सांगण्यासाठी सदोदित जनजागर करतात. मात्र, जपानच्या प्राणिसंग्रहालयाने एक अजब-गजब मोहीम हाती घेतली आहे. झुरळ हा पृथ्वीवरील सर्वात जास्त तिरस्कार सोसणारा कीटक आहे. सर्वच देशांत झुरळाला गलिच्छ, किळसवाणा कीटक मानले जाते. पृथ्वीवर ४००० विविध प्रजाती आहेत. मात्र, झुरळाला सर्वात हिणकस वागणूक दिली जाते. सर्वत्र आढळणाऱ्या या कीटकाची प्रतिमा जनमानसात उजळ करण्याचा विडा जपानी प्राणिसंग्रहालय प्रशासनाने उचलला आहे. शुनान्शी टोकुयामा प्राणिसंग्रहालयाचे प्रशासन त्यासाठी प्रयत्नशील आहे.