आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असद यांची साथ सोडा, अमेरिकेचा मॉस्कोला संदेश; सिरियावरून उभय देशांत तणाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को- अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रॅक्स टिलरसन यांनी बुधवारी प्रथमच मॉस्कोला भेट दिली. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांच्याशी त्यांनी संवाद साधला. टिलरसन यांनी सांगितले की, रशियाने राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांची साथ सोडावी. लावरोव म्हणाले की, सिरियावरून उभय देशांतील तणाव वाढला आहे. दोन्ही देशांच्या नेत्यांची ही पहिलीच भेट आहे.  

टिलरसन म्हणाले, आम्ही दोन्ही देशांतील मतभेदांचे गांभीर्य जाणतो. मतभेद दूर करण्याची पराकाष्ठा आम्ही करू. यावर लावरोव म्हणाले की, सिरियातील अमेरिकन हल्ले आम्हाला पसंत नाहीत. टिलरसन यांचे आगमन योग्य वेळी झाले आहे. त्यामुळे अमेरिकेचा दृष्टिकोन समजेल, असे लावरोव म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...