आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांसाठी पुरुषांचे हाय हिल सँडल घालून आंदोलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेबनाॅन - लेबनाॅनमध्ये दबाइहे शहरात रविवारी झालेल्या एका इव्हेंटदरम्यान "वॉक ए माइल इन हर शूज' मध्ये मुलींच्या उंच टाचांच्या सँडल घालून पुरुषांनी वॉक केला. महिलांवर होणारे अत्याचार, लैंगिक शोषण व कौटुंबिक हिंसाचाराला विरोध करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय स्तरावर हे अभियान सुरू करण्यात आले आहे.
अभियानातून महिलांना मदत करणार : या उपक्रमात पुरुषांनी उंच टाचांच्या लाल सँडल घालून एक किलोमीटरपर्यंत वॉक केला. वॉक करत असताना पुरुष मंडळी निधी संकलनही करतात. जमा झालेल्या रकमेचा विनियोग कौटुंबिक हिंसाचार व बलात्कारपीडित महिलांना मदत करण्यासाठी केला जातो.