आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणच्या उपराष्ट्रपतींचे जर्मन मंत्र्यांशी हस्तांदाेलन, लेस्बियन मंत्री लोकांना वाटला पुरुष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेहरान (इराण) - मासुमेह अबतकार. या आहेत इराणच्या उपराष्ट्रपती आणि पर्यावरणमंत्री. काही दिवसांपूर्वी त्या जर्मनी दौऱ्यावर होत्या. पर्यावरणासंबंधी दोन्ही देशांत झालेल्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आणि मासुमेह यांनी जर्मन मंत्री बार्बरा हेंडरिक्स यांच्याशी हस्तांदोलन केले. हे छायाचित्र माध्यमांत प्रसिद्ध होताच गोंधळ उडाला. इराणच्या लोकांना जर्मनीच्या या मंत्री म्हणजे पुरुष वाटला होता. वास्तविक छायाचित्रात जर्मन मंत्री पँट-शर्ट अशा पोशाखात आहेत. केसही अगदी बारीक. हे छायाचित्र प्रसिद्ध होताच इराणमध्ये वादंग माजले. मासुमेह यांच्याविरुद्ध निदर्शने सुरू झाली. लोकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. कारण, इराणमध्ये महिलांनी पुरुषांशी हस्तांदोलन करणे गुन्हा आहे. हे वादंग माजलेले असताना जर्मनीच्या मंत्री बार्बरा वास्तविक लेस्बियन असल्याचे कळले. त्या नेहमीच पुरुषांसारखा पोशाख घालतात. केशरचनाही पुरुषांसारखीच. खरे तर बार्बरा स्वत:ला पुरुषच मानते. २०१३ मध्ये त्यांनी स्वत:ला लेस्बियन घोषित केले होते. जर्मनीच्या इतिहासात त्या पहिल्या लेस्बियन मंत्री आहेत. विकिलीक्सनुसार, १९७९मध्ये इराण इस्लामिक प्रजासत्ताक झाल्यापासून तेथे चार हजारांहून अधिक तृतीयपंथीयांना मृत्युदंड देण्यात आला आहे. इराणमध्ये समलैंगिक संबंध पुरुषांशी हस्तांदोलन गंभीर गुन्हा आहे. मासुमेह तर इराणच्या पहिल्या महिला मंत्री आहेत. म्हणूनच त्यांच्यावर लोक अक्षरश: तुटून पडले.
लेस्बियन महिलेशी तरी हस्तांदोलन कशाला, असा प्रश्न त्यांना विचारला जात आहे.
दरम्यान, काही महिलांनी याबाबत स्वागतही केले आहे. इराणमध्ये इस्लामी कायदा असल्याने अनोळखी पुरुषाशी हस्तांदोलन करणे हा गुन्हा ठरतो. या आधारे मासुमेह बडतर्फही झाल्या असत्या.
{ इराणमधील इस्लाम किती असहिष्णू आहे हे सारे जग उघड्या डाेळ्यांनी पाहत आहे. -मिशेल
{महिला... हस्तांदोलन करू नका, गाडी चालवू नका, पुरुषांसोबत फिरू नका, हे लोक अजब आहेत -नसिफा
{ काही तासांत माध्यमांत साेशल मीडियात कट्टरवाद्यांनी ओरड सुरू केली. -सादेघ घोरबानी
{ती पुरुष जरी असती तरी हस्तांदोलन करण्यात कसला आलाय गुन्हा? -तिबोर
बातम्या आणखी आहेत...