आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Let's Break Up,' Thai Lottery Winner Texts Wife, Who Sues

लॉटरी लागली अन् पत्नी सोडली!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकॉक- कपड्याच्या दुकानातील एका सुरक्षा रक्षकाला जवळपास साडेआठ लाख डॉलर्स म्हणजेच साडेपाच कोटी रुपयांची लॉटरी लागली. त्याच्या काही आठवड्यांतच पठ्ठ्याने बायकोला चक्क घटस्फोटाचा मेसेज केला. मग संतापलेल्या बायकोने त्याच्यावर १ कोटी ८५ लाखांचा पोटगीचा दावा ठोकला. थायलंडमध्ये ही घटना घडली.

अनेक वर्षे एकत्र राहणाऱ्या थम्मारोंग कीवासुदजिंक व साओवानी थाँगविसेट या दांपत्याला १६ सप्टेंबर रोजी ही लॉटरी लागली. त्यांनी बँकेतून बक्षिसाची रक्कम काढून पतीच्या खात्यात टाकली. काही दिवसांनी पतीने पत्नी व मुलाच्या खात्यात ७ लाख बहात (१२ लाख ९४ हजार रुपये) जमा केले. यानंतर सोमवारी २८ वर्षीय पत्नी साओवानीला नवऱ्याकडून ‘लेट्स ब्रेक अप’ चा मेसेज आला.