आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Letting Them Die: Parents Refuse Medical Help For Children In The Name Of Christ

तरुणीने आपल्या पालकांच्या विरोधात सुरू केली मोहीम, अंधश्रद्धेमुळे उपचार नाही केला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इडाहो (अमेरिका) - मारिया वॉल्टन २० वर्षांची तरुणी. जन्मापासूनच हृदय आणि फुप्फुसाच्या आजाराशी झुंज देत आहे. तिला या आजारामुळे मास्कशिवाय प्राणवायूदेखील घेता येऊ शकत नाही. रुग्णालयाच्या खाटेवरून उठल्यानंतरही तिला ऑक्सिजन टँक सोबत बाळगावाच लागतो.
आजारी असली तरी मारियाचा आवाज बुलंद आहे. तोही स्वत:च्याच आई-वडिलांच्या विरोधात. कारण त्यांनी मारियाला उपचारासाठी कधीही डॉक्टरांकडे नेले नव्हते. धर्मवेडेपणातून त्यांनी तिच्या आजारापणाकडे १८ वर्षे दुर्लक्ष केले. ती प्रार्थनेतून बरी होईल, अशी त्यांची धारणा होती. आई-वडिलांच्या वागण्याचा अर्थ उमजल्यानंतर मारियाने दोन वर्षांपूर्वी घर सोडले. मारिया म्हणते, होय. मला माझ्या पालकांना त्यांच्या चुकीबद्दल शिक्षा देण्याची इच्छा आहे. जेणेकरून इतरांना धडा मिळू शकेल. त्याचबरोबर माझ्यासारख्या मुलांना उपचाराचा हक्क मिळू शकेल. आजाराची जाणीव झाल्यानंतर मी डॉक्टरांना भेटायला गेले. तेव्हा सामान्य उपचारातूनही पूर्वीच हा आजार बरा होऊ शकला असता, असे मला डॉक्टरांनी त्यावेळी सांगितले; परंतु आता ह्रदय आणि फुप्फुस प्रत्यारोपणाशिवाय काहीही पर्याय उरलेला नाही.
प्रकरण अमेरिकेतील इदाहोचे आहे. अनेक दशकांपासून येथे मुलांवरील उपचार चर्चमधील प्रार्थनेद्वारे करण्याची परंपरा आहे. या भागातील पालक मुलांना आजारी पडल्यानंतर डॉक्टरांकडे घेऊन जाण्याऐवजी चर्चमध्ये नेतात. प्रार्थना आणि आस्थेच्या शक्तीतून आजार बरा होऊ शकतो, अशी त्यांची धारणा आहे. बोस्टन विद्यापीठाचे इतिहासाचे प्रोफेसर रोजर्स म्हणाले, १९७४ मध्ये चाइल्ड अब्जूज प्रिव्हेंशन अँड ट्रिटमेंटचा कायदा तयार झाला होता. परंतु त्यात एका गोष्टीची तरतूद करण्यात आली होती. आजारावर केवळ प्रार्थना हाच उपाय आहे, अशी धारणा असलेले पालक या कायद्याच्या कक्षेत येत नसल्याची विचित्र तरतूद कायदा दुरुस्तीतून करण्यात आली होती. ही कुरिती संपणे गरजेचे आहे, असे मारियाला वाटते. त्यासाठी मारियाने प्रोटेक्ट इडाहो किड्सच्या माध्यमातून लेट देम लिव्ह नावाची मोहीम चालवण्यास सुरुवात केली. त्यात मारिया वॉल्टनला दाखवण्यात आले आहे. मारिया या मोहिमेत सक्रिय आहे. मारिया व तिची बहीण राज्यकर्त्यांसोबत या चर्चासत्रात सहभागी झाली होती. त्यात मारियाने संपूर्ण ताकदीने आपले म्हणणे मांडले. मला पुढल्या संसदीय सत्रात बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या मसुद्यात योग्य दुरुस्ती हवी आहे. आता आपण गप्प राहिलो तर परिस्थिती आणखी बिघडेल. २०१२ मध्ये एक १५ वर्षांची मुलगी विषबाधेमुळे मरण पावली होती. तिला वांत्या होत होत्या. तोंडातून रक्त निघत होते, तरीही तिला तिचे आई-वडील डॉक्टरांंकडे घेऊन गेले नव्हते. केवळ प्रार्थना करत होते. आपल्या श्रद्धेच्या नावाखाली आई-वडिलांनी मुलांचे प्राण धोक्यात टाकू नये. हे थांबलेच पाहिजे. म्हणून आमच्या मोहिमेद्वारे लोकांमध्ये जागरूकता आणता येऊ शकेल. त्यातून राज्यकर्त्यांवरदेखील कायदा दुरुस्तीसाठी दबाव वाढवता येईल, असा विश्वास मारियाने व्यक्त केला आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, संबंधित फोटो