आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोघांच्या भांडणात तिसऱ्या देशाची निर्मिती, झेक नागरिकांनी स्थापन केला नवा देश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झेक रिपब्लिक - सर्बिया आणि क्रोएशियादरम्यान डेन्बू नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर जमिनीच्या ज्या भागावरून वाद सुरू होता, त्याच ठिकाणी झेक नागरिक विट जेडलिका यांनी देशाची स्थापना केली आहे. त्यांनी ७ चौ. किमी परिसरात निश्चित केलेल्या देशाला लिबरलँड (मुक्तिवादी देश) नाव देण्यात आले आहे.

या देशाची घटना, झेंडा आणि प्रतीक चिन्हाची अधिकृत वेबसाइट आणि फेसबुक पेजही आहे. जगा आणि जगू द्या, असे देशाचे घोषवाक्यही ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे १ लाख ६० हजार लोकांनी या देशाच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला आहे. सर्व नागरिक आर्थिकदृष्ट्या संपन्न असल्याचा आपणाला अभिमान असल्याचे लिबरलँडने म्हटले आहे. याबरोबर घटनेत नेत्यांच्या शक्तीवर अंकुश ठेवण्यात अाला आहे. यामध्ये देशातील लोकांच्या स्वातंत्र्यामध्ये जास्त हस्तक्षेप केला जाऊ नये यावर लक्ष देण्यात आले आहे. राजकारणी पहिल्यांदा आपल्या भल्याचा विचार करतात, त्यानंतर देशाचा विचार केला जातो. ऑस्ट्रियन राजदूताकडून या प्रक्रियेसाठी पाठिंबा मिळत असल्याचा लिबरलँडचा दावा आहे. ते ऑस्ट्रियाशी चांगले संबंध ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत. जेडलिका या देशाचे राष्ट्रपती आहेत. जेडलिका यांनी केवळ ५ हजार लोकांना नव्या सार्वभौम देशाचे नागरिक होण्याचे आवाहन केले होते. मात्र, ही संख्या लाखात पोहोचली. टेरानुली क्षेत्रातील हे ठिकाण नो मॅन्स लँड आहे. त्यासाठी आतापर्यंत नागरिकांच्या कागदपत्रांच्या छाननीचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी सात स्वयंसेवक कार्यरत आहेत. त्यांच्याकडून १.६० लाख अर्जांची छाननी केली जात आहे. यानंतरच योग्य लोकांना नागरिकत्व दिले जाईल.

दुसऱ्यां प्रती आदर असणाऱ्या लोकांचा लिबरलँड शोध घेत आहे. नागरिकांना सामावून घेताना त्यांची जात, धर्म आणि वर्ण पाहिला जाणार नाही. ते कम्युनिस्ट किंवा नाझीवादाचे समर्थक नसावेत. लिबरलँडचे फेसबुक पेज वेगाने लोकप्रिय होत आहे. त्याला दरराेज लाइक्सची संख्या वाढत आहे.

चलन असे असेल?
देश तर स्थापन केला. मात्र, आता या देशाचे चलन कसे आणि काय असेल, याबद्दल लोकांना प्रचंड उत्सुकता आहे. याबाबत नेत्यांनी अद्याप काहीही जाहीर केलेले नाही.
फोटो - झेक नागरिक विट जेडलिका