आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजीने विकले होते वेश्‍यालयात, मोठेपणी किती खून केले तिलाच माहित नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लहानपणीच तिच्‍या आजीने तिला वेश्‍यालयात विकले. झोपाळ्या वाचून झुलण्‍याच्‍या वयात तिने खूप काही सहन केले. आज ती ब्राजीलमधील सर्वात मोठी आणि कुख्‍यात ड्रग माफिया म्‍हणून ओळखली जाते. एवढेच नाही तर आपल्‍या विरोधकांना जमिनीमध्‍ये जिवंत गाडल्‍याचा आरोपही तिच्‍यावर आहे. आता तिचे वय झाले. तिला तीन मुलंही आहेत. सर्वसामान्‍य व्‍यक्‍तीप्रमाणे ती आता जगत आहे. राक्वेल डी ओलिव्‍हि‍यरा असे त्‍या लेडी डॉनचे नाव आहे.
बालपण वेश्‍यालयात गेले; पण वेश्‍या बनली नाही ...
> राक्वेलचे 'नंबर वन' नावाने आत्‍मचरित्र नुकतेच प्रकाशित झाले. त्‍यात तिने अनेक धक्‍कादायक दावे केलेत.
> 'माझ्या आजीने मला लहानपणीच वेश्‍यालयात विकले होते. एका गँगस्‍टरने मला विकत घेतले होते', असा गौप्‍यस्‍फोट तिने केला.
> त्‍या नंतर मी वेश्‍यांच्‍या हाताखाली काम केले. मात्र, देहविक्र‍य करण्‍याची वेळ कधी माझ्यावर आली नाही.
> मी ज्‍या कुटुंखान्‍यात होते तेथील मालकाने एक नियम घालून दिला होता. जर कुण्‍या मुलीची देहविक्रय करण्‍याची इच्‍छा नसेल तर तिच्‍यावर या कामासाठी दबाव आणू नये, तिला दुसरे काम करू द्यावे.
> त्‍यामुळे या दललित राहूनसुद्धा मी वेश्‍या बनले नाही.
> वयाच्‍या 11 व्‍या वर्षी मी ड्रग्सच्‍या काळ्या धंद्यात पाय ठेवला. या काळात मला ड्रग्सचे व्‍यसनही लागले.
> याच वयात बंदुक‍ही हाताळणे शिकले. 15 व्‍या वर्षी माझ्यावर खुनाचा पहिला गुन्‍हा दाखल झाला.
> ड्रग डीलिंग करताना एक गँगस्‍टर माझ्यावर बलात्‍कार करण्‍याचा प्रयत्‍न करत होता. त्‍याची मी हत्‍या केली होती, असे तिने या पुस्‍तकात लिहिले.
> आयुष्‍यात मी किती लोकांचे खून केले, हे सांगणे आता अवघड आहे, असा धक्‍कादायक खुलासही तिने केला.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...