न्युयॉर्क- डेल्टा एअरलाईन्सचे विमान अमेरिकेच्या अटलांटा विमानतळावर उड्डाण करण्याच्या तयारीत होते. पण त्यावेळी अचानक विमानावर प्रलयकारी वीज कोसळली. ही अंगावर काटा आणणारी घटना व्हिडिओ कॅमेऱ्यात टिपण्यात आली आहे.
विमानावर वीज कोसळली तेव्हा त्यात 111 प्रवासी आणि 6 केबिन क्रू सदस्य होते. जॅक पार्किस नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ शुट केला आहे. वीज कोसळली पण सुदैवानं त्यात विमानाची हानी झाली नाही.
अटलांटा विमानतळाच्या परिसरात खराब हवामान असल्याने विमानाला उड्डाण करण्यास विलंब होत होता. विमानतळाच्या धावपट्टीवर इतर विमानांसह हे विमान अडकून पडले होते. या दरम्यान वीज या विमानावर कोसळली. जॅक एका विमानात होता. विमानाला विलंब होत असल्याचा व्हिडिओ त्याला पत्नीला पाठवायचा होता. यावेळी ही भयंकर घटना कॅमेऱ्यात कैद झाली.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा या थरारक घटनेचे फोटो....