आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lioness Tries To Kill Wild Beast, But His Struggle Keeps Him Alive, Watch VIDEO

जिद्दीला सलाम, हा VIDEO बघितल्यावर तुम्ही कोणत्याही मोठ्या संकटावर मात कराल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंहिणीच्या पोलादी जबड्यात मान फसली की कोणत्याही प्राण्याचा मृत्यू निश्चितच असतो. सिंहिणीचे टोकदार मोठे सुळे, तिची प्रचंड ताकद, शिकारीचा अनुभव आणि विशेष म्हणजे तिला लागलेली प्रचंड भुक कोणत्याही प्राण्याचा लगेच प्राण घेते. पण या वाईल्ड बिस्टच्या जिद्दीला खरंच सलाम ठोकायला हवा. साक्षात मृत्यूच्या दारात असतानाही त्याची धडपड आपल्याला बरंच काही शिकवून जाते.
या व्हिडिओत एक सिंहिण वाईल्ड बिस्टची मान जबड्यात धरुन असलेली दिसते. ती बराच प्रयत्न करते. पण वाईल्ड बिस्ट संघर्ष सोडत नाही. तो योग्य संधीची वाट बघतो. जरा वेळाने सिंहिणीच्या जबड्याची पकड सैलावते. या संधीचा तो योग्य फायदा उचलतो. लगेच सिंहिणीला उलटे पाडतो. पण तरीही सिंहिण त्याची मान सोडत नाही. तिही चिवट असते.
तरीही वाईल्ड बिस्ट हिंमत सोडत नाही. प्रयत्न सुरुच ठेवतो. अखेर त्याला उपयुक्त संधी मिळते. तो सिंहिणीच्या मजबूत पकडीतून आपली मान सोडवतो. त्यानंतर विशेष म्हणजे सिंहिणीला पळवूनही लावतो. हा व्हिडिओ सुमारे चार लाख लोकांनी बघितला आहे. तो खरंच प्रेरणादायी आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, वाईल्ड बिस्टच्या संघर्षाची कहाणी.... खरंच आहे प्रेरणादायी.... अखेरच्या स्लाईडवर बघा व्हिडिओ....