आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिलेरी Vs ट्रम्प: 8 वर्षात अमेरिकेचे कर्ज दुप्पट, अर्थव्यवस्था वाढविण्यावरुन जोरदार चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अध्यक्षपदाचे उमेदवार असलेले डेमॉक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यात मंगळवारी पहिला युक्तीवाद झाला. या चर्चेदरम्यान दोन्ही उमेेदवारांनी अनेक मुद्द्यांवर एकमेकांंवर आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. अमेरिकेची अर्थव्यवस्था वाढविण्यावर हिलरी आणि ट्रम्प यांचा जोर दिसून आला.

बराक ओबामांनी अमेेरिकेचे कर्ज दुप्पट केले...
राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी 8 वर्षात अमेरिकेचे कर्ज दुप्पट केल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. तर तुम्ही तर एका टि्‍वटवर भडकतात. ISIS या दहशतवादी संघटनेशी लढण्याचे नियोजन करण्यात आले, यावर तुम्ही काय केले? असा सवाल हिलरी यांनी केला.

अर्थव्यवस्था वाढविण्यावरुन जोरदार चर्चा
डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्यात अर्थव्यवस्था वाढविण्यावरुन जोरदार चर्चा झाली. कंपन्यांंवर लावण्यात आलेल्या करात कपात करण्याचे ट्रम्प यांनी सांगितले. सध्या कंंपन्या 35 टक्के कर भरतात. तो कर 15 टक्यांपर्यंत अाणण्याचे ट्रम्प यांनी आश्वासन दिले.

युुक्तिवादाची सर्वाधिक चर्चा...
1980 मध्ये जिमी कार्टर आणि रोनाल्ड रेगन यांच्यादरम्यान झालेल्या वादविवादानंतर सर्वाधिक पाहिला जाणारा हा 'वादविवाद' म्हणून हिलरी आणि ट्रम्प यांच्या युक्तिवादाकडे पाहिले जात आहे. ट्रम्प यांचा खरा चेहरा लोकांसमोर आणूनही काही उपयोग होणार नाही, असे हिलरी यांना वाटते. या सर्वोच्च पदासाठी त्यांची मनोवृत्ती योग्य नाही, हे लोकांसमोर आणावे लागेल, असे युक्तिवादापूर्वी हिलरी यांनी सांगितले होते. हिलेरी म्हणाल्या की, 'जी व्यक्ति एका 'ट्वीट'वर इतकी भडकत असेेल तर त्याच्या हातात न्यूक्लियरचे बटण देणार काय? ट्रम्प यांचे टेम्परामेंट देखील काहीसेे असेच आहेत.

नोकर्‍या, अर्थव्यवस्था, शस्त्रवापर, ISIS, मुस्लिम, सायबर हल्ल्यासारख्या अनेक मुद्यांवर जाहीर चर्चा....
- हिलेरी क्लिंटन म्हणाल्या, आम्ही अशी अर्थव्यवस्था बनवणार आहोत की, त्यात समाजातील सर्व स्तरावरील नागरिकांचा विचार करण्यात येईल.
- ट्रम्प यांना अर्थव्यवस्थेचे फारसे ज्ञान नसल्याची टीका हिलरी यांनी केली.
- ट्रम्प यांनी वडिलांकडून 40 मिलियन डॉलरचे कर्ज घेतले होते. तेव्हा कुुठे त्यांनी बिझनेस सुरु केल्याची खोचक टीका हिलरी यांनी केली.
- वडिलांकडून कर्ज घेऊन सुरु केलेली कंपनी आज बिलियन डॉलरमध्ये खेळत असल्याचे सांगत ट्रम्प यांनी हिलरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
- उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मदत केली पाहिजे, त्यासाठी त्यांना कर्जाची सोय करणार असल्याचे आश्वासन हिलरी यांनी दिले.
- आयएसआयएस या जहाल दहशतवादी संघटनेशी लढण्याचे नियोजन करण्‍यात आले आहे. पण तुम्ही काय केले? असा सवाल हिलरी यांनी ट्रम्प यांना केला. माझ्या पतीने 90 च्या दशकात चांगले काम केल्याचे हिलरी म्हणाल्या.
- अमेरिकेतून चोरी होणार्‍या नोकर्‍या थांबायला हव्या, ते अााम्ही करून दाखवणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
- राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी 8 वर्षात अमेरिकेचे कर्ज दुप्पट केले आहे. तसेच फेडरल रिझर्व्ह आपले काम करत नसून राजकारण करत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला.
- त्यावर आम्ही 10 लाख नोकर्‍या उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन हिलरी यांनी दिले. - त्यावर ट्रम्प यांनी हिलरी यांच्यावर हल्ला चढविला. त्या फक्त बोलणार्‍या नेत्या आहे. काम करत नाही, अशी जोरदार टीका ट्रम्प यांनी केली.
- ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना वारंंवार खाली खेचण्याचा प्रयत्न केल्याचे हिलरी म्हणाल्या. डोनाल्ड ट्रम्प यांनी कृष्णवर्णीयांबद्दल जी भूमिका मांडली ती अत्यंत दुर्देवी असल्याचेही हिलरी म्हणाल्या.
​- हिलरी यांनी आधी आपल्या ईमेल्सची माहिती द्यावी, त्यानंतर आपण टॅक्स रिटर्न्स जाहीर करू, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
- त्यावर हिलरी यांनी वैयक्तिक ई-मेलचा वापर करुन चूक केल्याचे जाहीर केले. त्याची संपूर्ण जबाबदारी घेत असल्याचेही म्हटले. सायबर युद्द आपल्यासाठी सर्वात मोठे आव्हान असल्याच्या भावना हिलरी यांनी व्यक्त केली.
- बराक ओबामा यांना जन्मदाखला मागून मी देशाच्या हिताचे काम केल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. हिलरी यांच्याकडे अनुभव आहे मात्र तो वाईट अनुभव, हिताचे कोणतेच निर्णय त्यांनी घेतले नाहीत, त्या अनुभवाची देशाला गरज नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.
- त्यावर हिलरी यांनी ट्रम्प यांचा समाचार घेतला. ट्रम्प यांनी महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत त्यांचा अपमान केला आहे. इराकमधून बाहेर पडण्याचा निर्णय जॉर्ज बुश यांचा होता. ट्रम्प यांनी वारंवार मुस्लिमांचा अपमान केला आहे. ट्रम्प यांनी महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत त्यांचा अपमान केला असल्याचे हिलरी यांनी सांगितले.
पुढील स्लाइडवर वाचा, ट्रम्प यांनी चर्चेत चिडावे अशी हिलरींची व्यूहरचना... अशी केली होती हिलरी आणि ट्रम्प यांची जाहीर चर्चेची तयारी...
बातम्या आणखी आहेत...