आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ATM वर रांगा, मॉल्समध्ये शुकशुकाट, बघा ग्रीसमधील वास्तवदर्शी PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अथेंस (ग्रीस)- इंटरनॅशनल मॉनेटरी फंडच्या (आयएमएफ) कर्जाची रक्कम देण्यात अपयशी ठरलेल्या ग्रीसवर दिवाळखोरीची टांगती तलवार आहे. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या हा जगातील पहिला विकसित देत आहे. ग्रीसवर सध्या 11.14 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. गेल्या मंगळवारी ग्रीसला आयएमएफला 12 हजार कोटी रुपयांची पहिली इन्सॉलमेंट द्यायची होती. पण ग्रीसच्या अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे, की देश इन्स्टॉलमेंट देण्यात अवस्थेत नाही. उलट आयएमएफने ग्रीसला अतिरिक्त कर्ज मंजूर करावे. त्यातून देशाची आर्थिक घडी नीट करण्याचा प्रयत्न केला जाईल. आता 5 जुलै रोजी जनमत चाचणी घेतली जाणार आहे. यात जर आयएमएफच्या अटी मानण्यात आल्या नाही तर ग्रीसमध्ये आर्थिक अनागोंदी वाढण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक घडामोडी घडत असताना ग्रीस या देशात मात्र अत्यंत निराशेचे वातावरण पसरले आहे. बाजारपेठेत ग्राहक दिसत नसून एटीएमबाहेर लोकांच्या रांगा लागल्या आहेत. बॅंक पैसे देणे बंद करेल या भीतीपोटी लोक सगळे पैसे काढून घरी ठेवत आहेत. मॉल ओस पडले असून दुकानांमध्ये शुकशुकाट दिसत आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, ग्रीसमधील वास्तवदर्शी फोटो... असा पसरला आहे शुकशुकाट...