आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवादी तळांमुळे पाकव्याप्त काश्मिर बनले नरक, आंदोलनात नागरिकांनी व्यक्त केला संताप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकव्याप्त काश्मिरात दहशतवाद्यांच्या विरोधात आंदोलन. - Divya Marathi
पाकव्याप्त काश्मिरात दहशतवाद्यांच्या विरोधात आंदोलन.
पाकव्याप्त काश्मिरात स्थानिक नागरिकांनीही दहशतवाद्यांच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे. दहशतवाद्यांमुळे याठिकाणचे जीवन हे नरकासमान बनले आहे. त्यामुळे यापुढे दहशतवादी तळांना किंवा दहशतवाद्यांना रसद पुरवली जाणार नाही, याची काळजी घेणार असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.

पाकव्याप्त काश्मिरातील विविध स्थानिक नेत्यांनी पुढाकार गेत दहशतवाद्यांच्या विरोधात आवाज बुलंद केला आहे. पाकव्याप्त काश्मिरात दहशतवाद्यांचे तळ असल्याच्या वृत्तालाही त्यांच्याकडून दुजोरा देण्यात आला आहे. मुझफ्फराबाद, कोटली, मीरपूर, गिलगिट, दायमर आणि नीलम खोऱ्यातील नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. दहशतवादी प्रशिक्षण तळांनी परिसर उध्वस्त झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जर प्रशासनाने (पाकिस्तानी) लवकरात लवकर कारवाई केली नाही, तर स्थानिक लोक याविरोधात कारवाई करतील असेही आंदोलकांनी म्हटले आहे.

बंदी घातलेल्या संघटना, दहशतवाद्यांचे तळ यांना याठिकाणी अन्न, राशन अशी रसद पुरवली जात असल्याचे एका स्थानिक नेत्याने यावेळी सांगितले. दहशतवाद पूर्णपणे नष्ट करायला हवा. दहशतवाद्यांना पोसल्याने मुद्दा सोडवणे शक्य होणार नसल्याचे स्थानिकांनी यावेळी म्हटले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, पाकव्याप्त काश्मिरातील स्थानिकांचे दहशतवाद्यांच्या विरोधातील आंदोलनाचे PHOTOS.. अखेरच्या स्लाइड्सवर पाहा आंदोलनाचा VIDEO..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...