आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणी एकमेंकावर पडले, तर कोणी धक्का मारत पळाले; लंडन स्फोटांच्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्लास्टनंतर महिला आपल्या आप्तजनांना सुखरुप असल्याचे सांगत होत्या. - Divya Marathi
ब्लास्टनंतर महिला आपल्या आप्तजनांना सुखरुप असल्याचे सांगत होत्या.
लंडन - ब्रिटनधील पार्कन्स ग्रीन स्टेशनवर शुक्रवारी सकाळी 8.21 वाजता ट्यूब ट्रेनमध्ये स्फोट झाला. ब्रिटीश मीडियानुसार, या हल्ल्यात 20 प्रवासी जखमी झाले. स्फोट झाला तेव्हा ट्यूब ट्रेन पार्कन्स ग्रीन स्टेशनवर आली होती. काही प्रवासी बाहेर जाण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी ट्रेनमधील एका व्हाइट डस्टबिनमध्ये स्फोट झाला. त्यातून वायर आणि ऑईली केमिकल बाहेर पडले. त्याच वेळी विम्बल्डन येथून ट्रेन आली होती. त्यामुळे स्टेशनवर गर्दी होती. स्फाटानंतर प्रवाशांनी धावपळ सुरु केली. यात काही प्रवाशी जखमी झाले. काही प्रवाशी आरडोओरडा करत, रडत, किंचाळत पळत सुटले होते. स्फोटाच्या आवाजानंतर काही क्षणात स्कॉटलंड यार्ड कमांडो स्टेशनवर दाखल झाले. त्यांनी स्टेशन रिकामे केले. मेट्रोपॉलिटन पोलिसांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले. 
 
काय म्हणाले प्रत्यक्षदर्शी 
- शहजाद अफजल या 39 वर्षीय प्रत्यक्षदर्शीने सांगितले की घटनेनंतर तत्काळ पोलिस, आर्म्ड फोर्स, फायर ब्रिगेड आणि अॅम्ब्यूलन्स घटनास्थळी दाखल झाले, मात्र लोक एवढे घाबरलेले आणि भयभीत झाले होते की ते सैरावैरा धावत सुटले होते. पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा टाकला होता. मी एका महिलेला पाहिले त्यांना स्ट्रेचरवर घेऊन जाण्यात आले. त्या जखमी होत्या मात्र त्या सर्वकाही पाहात होत्या. 
- एका प्रवाशाने घटनेचा फोटो ट्विट करत लिहिले, 'पार्सन्स ग्रीन डिस्ट्रिक्ट लाइन ट्रेनमध्ये स्फोट झाला. आमच्या डब्यात एक चिंगारी उडाली.'
- रॉबिन फ्रॉस्ट या प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने बीबीसीला सांगितले, की मी स्टेशनमध्ये प्रवेश केला तेव्हा तिथे रस्क सांडलेले होते. लोक पायऱ्यांच्या दिशेने धावत होते, त्यासोबत स्टेशनमध्ये येणाऱ्यांना बाहेर पळा असा इशार करत होते. जे लोक स्टेशनबाहेर पडत होते, ते देखील रक्ताने माखलेले होते. 
- एम्मा स्टीव्हीने सांगितले, की ज्या डब्यात स्फोट झाला त्याला लागूनच असलेल्या दुसऱ्या डब्यात मी होते. स्फोट झाल्याबरोबर लोक ओरडायला आणि पळायला लागले. एवढे जोरात मी आयुष्यात कधीही पळाले नाही. सर्वात वाईट गर्दी पायऱ्यांवर होती. तिथे जणू लोक एकमेकांवर चढलेले होते. मी कशीतरी स्टेशन बाहेर आले. अनेक जखमी लोक बाहेर प्रथमोपचार घेत होते. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, लंडन ब्लास्टनंतरचे दृष्य.. 
बातम्या आणखी आहेत...