आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडन ट्यूब ट्रेन ब्लास्ट : 18 वर्षांच्या संशयिताला अटक, हल्ल्यात 29 जण जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटन दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. या वर्षांतील हा पाचवा हल्ला आहे. - Divya Marathi
ब्रिटन दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. या वर्षांतील हा पाचवा हल्ला आहे.
लंडन - लंडन भुयारी मेट्रो स्फोट प्रकरणात पोलिसांनी शनिवारी एका 18 वर्षांच्या संशयिताला अटक केली आहे. ब्रिटनची राजधानी लंडनच्या पार्सन्स ग्रीन स्टेशनवर शुक्रवारी ट्यूब ट्रेनमध्ये (भूयारी रेल्वेला येथे ट्यूब ट्रेन म्हणतात) स्फोट झाला होता. हल्ल्याची जबाबदारी ISIS ने घेतली होती. दहशतवादी संघटनेची वृत्तसंस्था अमाकने म्हटले, 'लंडनमध्ये झालेले स्फोट हे आमच्याच लोकांनी घडवून आणले.' या हल्ल्यात 29 जण जखमी झाले होते. स्फोटात इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस (IED)चा वापर करण्यात आला होता. ब्रिटनमध्ये या वर्षाचा हा पाचवा दहशतवादी हल्ला होता. लंडनच्या अँटी टेररिझम पोलिस दलाचे प्रमुख मार्क रॉवले यांनी सांगितले, की अटक करण्यात आलेल्या मुलाला स्टेशनवर चाकू घेऊन पळताना पाहिले गेले होते. पोलिस त्याची कसून चौकशी करत आहे.
 
केव्हा आणि कुठे झाला स्फोट 
स्फोट शुक्रवारी सकाळी 8.21 वाजता झाला. स्फोट झाला तेव्हा ट्यूब ट्रेन पार्सन्स ग्रीन स्टेशनवर आली होती. स्फोटकं एका पांढऱ्या रंगाच्या बकेटमध्ये ठेवण्यात आले होते. तिथे काही वायर आणि ऑइली केमिकल सांडलेले दिसले. 
 
कुठे ठेवली होती स्फोटकं
 - स्फोटानंतर दोन प्रत्यक्षदर्शी समोर आले. लंडनचा नागरिक असलेल्या या व्यक्तीने दोन फोटोही ट्विटरवर शेअर केले. त्यासोबत म्हटले आहे, की मी घटनास्थळी उपस्थित होतो. डब्यामध्ये स्फोट झाल्यानंतर तिथे वायर आणि केमिकल स्पष्ट दिसत होते. 
बातम्या आणखी आहेत...