आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लांब पायांनी करिअरमध्ये घातला खोडा, कुणी मॉडेलिंगचे काम देत नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलिफोर्निया (अमेरिका)- प्रत्येक मुलीला वाटते, की आपले पाय लांब असावे. त्याने सौंदर्यात भरच पडते. पण 22 वर्षीय चेज केनेडी हिच्या लांब पायांनीच करिअरमध्ये खोडा घातला आहे. चेज ही एक मॉडेल आहे. पण पाय लांब असल्याने तिला नवीन असायमेंट मिळणे अवघड होऊन बसले आहे. लांब पायांमुळे अनेक अॅड एजन्सीजने तिला रिजेक्ट केले आहे. तिला कुणी काम देत नाहीये.
रेकॉर्ड आपल्या नावावर करणार
6.5 फुट लांबी असलेल्या चेजच्या पायांची लांबी 51 इंच आहे. विश्वविक्रमापेक्षा केवळ 0.9 तिचे पाय लहान आहेत. सध्या हा रेकॉर्ड अमेरिकेतील होली बर्टच्या नावावर आहे. कॅलिफोर्नियाच्या ओबिस्पो परिसरात राहणाऱ्या चेजला शाळेय आयुष्यात कायम लेग्स आणि जिराफ या नावांनी बोलविले जायचे. पण खेळांमध्ये लांब पायांची खुप मदत झाली, असेही ती सांगते.
उंचीवर आहे प्रेम
चेज सांगते, की मला माझ्या पायांचा अभिमान आहे. मला असेच लांब पाय हवे होते. अमेरिकेत सर्वांत लांब पाय असल्याचा रेकॉर्ड मला माझ्या नावावर करायचा आहे. पण मी जेव्हा होलीचा व्हिडिओ बघितला तेव्हा मी हैराण झाली. तिचे पाय माझ्या पायांपेक्षा लांब आहेत. त्यानंतर माझ्या मनात निराशा संचारली. पण तरीही मी हा रेकॉर्ड माझ्या नावावर करणार आहे. कारण योग्य पद्धतीने मोजल्यास माझे पाय तिच्यापेक्षा लांब आहेत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, चेज केनेडी हिचे फोटो.... असे लांब पण सुंदर आहेत तिचे पाय....