आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: महिला पर्यटकाच्या नजरेतून बघा पाकिस्तान, म्हणाली- लाहोर सर्वांत Safe

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो ओळ- पाकिस्तानमध्ये बादशाही मशिदीबाहेर लोकांसोबत बसलेली टियो.)
तबलिसी- जॉर्जियातील तबलिसी येथील रहिवासी फोटोग्राफर टियो जियोशविली यांनी पाकिस्तानमधील जनजीवनाचे फोटो टिपले आहेत. या देशाच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी तिला माहित नव्हते, की तिचा प्रवास एवढा रोमांचक ठरेल. गेल्या वर्षी तिने जेव्हा पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिचे मित्र आणि कुटुंबीयांनी याचा विरोध केला होता. हिंसाग्रस्त पाकिस्तान महिलांसाठी सेफ नाही, असे त्यांचे म्हणणे होते. तरीही टियो ऐकटीचे पाकिस्तानला गेली. या दौऱ्यानंतर पाकिस्तानकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोण बदलला.
टियो सांगते, की माझ्या आयुष्यातील हा सर्वात सुरक्षित प्रवास होता. मी नेहमीच पॉझिटिव्ह असते. मला वाटत होते, की माझ्या दौऱ्यात कोणतेही विघ्न येणार नाही. पाकिस्तानमधील संस्कृती आणि परंपरांनी मला विशेष आकर्षित केले. मला स्वतःलाही पाकिस्तान खुप सुरक्षित वाटला. येथील लोक मैत्रीपूर्ण व्यवहार करणारे आहेत. मला कोणत्याही प्रकारचा धोका जाणवला नाही. तथापी, या देशातही अशी अनेक ठिकाणे आहेत जेथे जाण्यात धोका आहे. पण लाहोर मला अतिशय सुरक्षित वाटले.
येथील बाजापेठांपासून शाळा-कॉलेज आणि लग्नासमारंभाचा आस्वाद टियोने लुटला. या देशात आलेले अनुभव कॅमेऱ्यात टिपले. तिच्या वेबसाईटवर हे फोटो टाकले. केवळ येथील लोकांना बघण्यासाठी मी एवढा लांब प्रवास केला नाही. मला येथील लोकांना आणि संस्कृतीला जवळून अनुभवायचे होते, असे ती सांगते.
असा मनात आला पाकिस्तानात जायचा विचार
टियो एक ट्रॅव्हल फोटोग्राफर आहे. फोटोग्राफीसाठी ती इराणच्या दौऱ्यावरही गेली होती. येथे तिची भेट काही ऑस्ट्रेलियाच्या फोटोग्राफर्ससोबत झाली. पाकिस्तानचा दौरा आटोपून ते इराणला आले होते. त्यांच्या अनुभवांनी टियो फार प्रभावित झाली होती. तिने पाकिस्तानला भेट देण्याचा निर्णय घेतला.
टियोच्या नजरेतून पाकिस्तान बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा....