आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करोडोची लॉटरी जिंकल्यानंतर असे काय घडले की तरूणी म्हणाली, बरबाद झाले मी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडनमधील जेन पार्क वयाच्या केवळ 17 वर्षी 8. 4 कोटी रूपयांची मालकिन बनली होती. - Divya Marathi
लंडनमधील जेन पार्क वयाच्या केवळ 17 वर्षी 8. 4 कोटी रूपयांची मालकिन बनली होती.
इंटरनॅशनल डेस्क- लंडनमधील जेन पार्कला चार वर्षापूर्वी जेव्हा 8. 4 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली तेव्हा अशी लॉटरी जिंकणारी ती सर्वात कमी वयाची ब्रिटिश नागरिक होती. वयाच्या केवळ 17 वर्षी कोट्यावधीची मालकिन बनली होती. यानंतर तिच्या आयुष्यात शॉपिंगचा सिलसिला सुरु झाला, मात्र आता जेन यामुळे त्रस्त झाली आहे. सर्व मित्र तुटले...
 
- जेन म्हणाली, मला जेव्हा लॉटरी लागली तेव्हा मला वाटले की, माझे आयुष्य खूप सुंदर असेल.  
- मात्र, असे घडले नाही. तर माझे चांगले व जवळचे मित्रही मला सोडून गेले.  
- कारण ते मित्र माझ्या पैशाकडे पाहायचे. आम्ही गरीब आहोत, तू आता श्रीमंत झाली आहे आम्हाला मदत कर असे म्हणायचे.
- मी असे किती मित्रांना मदत करू शकली असती, मी त्यांना हवे तितके पैसे न दिल्याने ते मला सोडून गेले.
- पण माझ्याकडे आता पैसे आहेत मात्र एकही मित्र नाही. मी आता एकटेच राहणे पसंत करते.
- मला आता पैशाचीही भीती वाटते आणि मित्रांचीही. पहिल्यापेक्षा माझे जीवन १० पटीने खराब झाले आहे.
- बरं झालं असतं मला लॉटरीच लागली नसती तर मी गरीब होते तेव्हाच सुखीच होते.
 
लोकांना वाटते मी आनंदी आहे-
 
- जर माझ्याकडे इतके पैसे आले नसते तर माझे जीवन सामान्य असते.  
- जेन म्हणते, लोक जेव्हा पाहतात तेव्हा त्यांना वाटते मी आनंदी आहे. 
- त्यांना वाटते की, त्यांनी ही लॉटरी जिंकली असती तर त्यांच्याकडे कोट्यावधी रूपये असते. 
- पण त्यांना हे माहित नाही की, मी पैसे तर जिंकले. खूप शॉपिंग केली, दोन फ्लॅटही खरेदी केले. 
- पण याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरे काहीच नुाही. मला हेच कळत नाहीये की माझ्या आयुष्याचा उद्देश नेमका काय आहे.
- लॉटरी लागल्यानंतर माझे शिक्षण थांबले तसेच इतर बाबीही मागे पडल्या.
 
आता लॉटरी कंपनीविरूद्ध केस ठोकण्याच्या तयारीत- 
 
- जेन आता या लॉटरीचे पैसेच आपल्या दुखाचे कारण मानते. 
- ती म्हणते की, 17 व्या वर्षी इतकी मोठी लॉटरी जिंकणे हे एखाद्याचे जीवनच संपवते. 
- जेनचे म्हणणे आहे की, या वयात समजत नाही की, एवढ्या पैशांचे मॅनेजमेंट कसे करायचे. 
- जेन म्हणते की, बरं झालं असतं माझ्याकडे एवढे पैसे नसते तर. त्यामुळे असा कायदा बनवला गेला पाहिजे की, ज्यांचे वय 18 वर्षापेक्षा कमी आहे त्यांना एवढ्या मोठ्या लॉटरीचे तिकिट खरेदी करता येऊ नये. 
- ती आता लॉटरी कंपनीवर केस करण्याबाबत कायदेशीर सल्ला घेत आहे. 
- जेन म्हणते, आता मला पैशाची फार गरज भासत नाही. 
 
लॉटरी कंपनीने जेनसाठी नियुक्त केला होता सल्लागार-
 
- जेन म्हणते, ‘जेव्हा मी पैसे जिंकले तेव्हा लॉटरी कंपनी ‘केमलॉट’ ने माझ्यासाठी सल्लागार नियुक्त केला होता. 
- ते लोक मला गुतंवणूक आणि बॉन्डबाबत समजून सांगायचे. पण त्यावेळी मला काहीच कळत नव्हते व त्याचे महत्त्वही नव्हते.
- मी तर माझ्या नातेवाईकांच्या सल्ल्याप्रमाणे पैसे खर्च केले किंवा गुंतवले.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जेनचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...