आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Love Story Of Mark Zuckerberg And Priscilla Chan

झुकेरबर्गच्‍या Wife ला आहे असे स्टंट करण्‍याचा छंद, वाचा Love Story

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅनफ्रान्सिस्को - फेसबुकचे संस्थापक सीईओ मार्क झुकेरबर्ग आपल्या मुलीच्या जन्मानंतर दोन महिन्यांत पितृत्व रजा घेणार आहेत. मात्र, मुलीचा जन्म केव्हा होणार याचा खुलासा त्यांनी केला नाही. पत्नी प्रिसिला चान गर्भवती असल्याची माहिती त्यांनी जुलैत दिली होती. झुकेरबर्ग यांनी फेसबुक पोस्टमध्ये ही माहिती दिली. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, पती-पत्नी आपल्या नवजात बालकासोबत वेळ घालवतात तेव्हा ते मूल आणि कुटुंबासाठी चांगले ठरते, असे संशोधनातूनही सिद्ध झाले आहे.
३१ वर्षीय झुकेरबर्ग यांना मुलगी व्हावी अशी इच्छा आहे. पत्नी प्रिसिला चान (३०) यांना अलीकडेच अनेक वेळा गर्भपाताला सामोरे जावे लागले होते. त्यातून सावरत पत्नीची भरपूर काळजी घेऊन प्रसूती सुखरूप होण्याची आणि पहिल्या बाळाचे स्वागत करण्याची त्यांना उत्सुकता लागली आहे. प्रत्येक दिवस आम्ही आमच्या बाळाच्या जवळ पोहोचत आहोत. आता हा टप्पा आणखी पुढे जाऊन प्रत्यक्षात उतरावा असे आम्हाला वाटते, असे झुकेरबर्गने म्हटले आहे. फेसबुकवरून झुकेरबर्गने आपल्या भावना मांडणारी पोस्ट केली आहे.
दोघांचा आहे प्रेमविवाह
मार्क आणि प्रिसिला यांचा प्रेमविवाह आहे. जेव्‍हा जुकरबर्ग हार्वर्ड यूनिव्‍हर्सिटीचे स्टूडेंट होते. त्‍यावेळी एका पार्टीत ते सहभागी झाले होते. दरम्‍यान, जुकरबर्ग हे वॉशरूमच्‍या बाहेर उभे होते. त्‍याच वेळी एका मुलीवर त्‍यांची नजर गेली. त्‍यांची तिच्‍यासोबत गप्‍पा सुरू केल्‍या. नंतर ते रोज भेटायला लागले. यातच त्‍यांचे प्रेम फुलत गेले. पुढे १९ मे २०१२ ला दोघांनी लग्‍न केले.

प्रिसिला आहे FB ची पहिली यूजर :
प्रेमात असताना जुकरबर्ग यांनी फेसबुक संदर्भात आपली पूर्ण योजना प्रिसिला यांना सांगितली. त्‍या फेसबुकला जॉइन करणाऱ्या पहिल्‍या यूजर आहेत.
प्रिसिला पाण्‍यात करतात स्टंट :
प्रिसिला चान यांना स्विमिंगचा छंद आहे. त्‍या जेव्‍हाही केव्‍हा मार्क यांच्‍यासोबत सुटी घालवण्‍यासाठी जातात तेव्‍हा स्विमिंगच करतातच. एवढेच नाही तर त्‍यांना संमुद्रात सर्फ बोर्डसोबत स्टंट करण्‍यात खूप आवडत आहे. त्‍यांचे असे अनेक फोटोज आहेत ज्‍यात त्‍यात पाण्‍यात स्टंट करताना दिसत आहेत.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...