आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lucky Man Survives In Saudi After Glass Fall Near From His Head

नशीब की योगायोग... VIDEO पाहा आणि तुम्हीच ठरवा काय ते..

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौदी अरबमध्ये एका नशिबवान व्यक्तीचे प्राण अगदी थोडक्यात बचावले. या घटनेमध्ये त्याे मृत्यू अगदी जवळून अनुभवला. हा व्यक्ती रस्त्यावरून जात होता त्याचवेळी अचानक एका इमारतीच्या खिडकीची भली मोठी काच त्याच्या डोक्याच्या अगदी जवळून जमिनीवर पडली आणि या काचेचा चुरा झाला. काच जेव्हा खाली पडली त्यावेळी या व्यक्तीच्या डोक्याला घासून ही काच गेली. तीन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये काय ?
एक व्यक्ती पांढऱ्या रंगाचा टॉब आणि काफियाह परिधान करून रस्त्यावर हळू हळू चालत आहे. काही वेळाने त्याला पायात काहीतरी अडकल्यासारखे त्याला वाटते. त्यामुळे तो काही वेळ थांबतो आणि ते पाहू लागतो. त्यानंतर तो पुन्हा हळू हळू चालू लागतो. तेव्हा अचानक एका इमारतीवरून काच खाली पडते. पण सुदैवाने काच त्याच्या कानाच्या अगदी जवळून खाली जमिनीवर पडते घाबरून तो व्यक्तीही खाली पडतो पण त्याला काही इजा होत नाही. घाबरून गेल्याने तो गोंधळून उठतो आणि त्याठिकाणाहून निघून जातो.
व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा वरील स्लाइ़डवर...