आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Luxurious Life Of German Tycoon Who's Spent 67 Lack In A Month

जर्मनीच्या या अब्जाधीश प्लेबॉयची अशी आहे LIFE, पाहून जळतात लोक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बास्तियन आणि मारिया योट्टा. - Divya Marathi
बास्तियन आणि मारिया योट्टा.
जर्मनीचा राहणारा बास्तियन आणि मारिया योट्टा त्याच्या लक्झरीयस लाइफमुळे इन्स्टाग्रामवर चांगलाच प्रसिद्ध आहे. बास्तियनला अब्जाधीश प्लेबॉय म्हणूनही ओळखले जाते. तो रोजच्या पूल पार्ट्या करतो, पण ते त्याच्या शेजाऱ्यांना आवडत नाही. त्यामुळे त्याला लॉस एंजल्सला शिफ्ट व्हावे लागले.

माझी पार्टरन पॅमेला अँडरसनपेक्षाही हॉट
महिनाभरात स्वतःवर 67 लाख रुपये खर्च करणारे बास्तियन म्हणतात की, माझी लाइफस्टाइल पाहून शेजाऱ्यांना ईर्ष्या व्हायची त्यामुळे मी जर्मनी सोडले आणि लॉस एंजल्सच्या बावर्ली हिल्समध्ये राहायला आलो. मी लहानपणी बेवॉच पाहायचो. तेव्हापासूनच मला लॉस एंजल्स आवडायचे. याठिकाणचे बीच आणि सुंदर मुली मला खूप आवडतात. आता मी स्वतः बेवॉच तयार करणार आहे. त्यासाठी माझ्याकडडे स्वतःची गर्ल आहे आणि ती पॅमेला अँडरसनपेक्षाही हॉट आहे.

बास्तियन आणि मारियाची भेट 3 वर्षांपूर्वी म्युनिकच्या रेस्तरॉमध्ये झाली होती. त्यावेळी मारिया 27 तर बास्तियन 35 वर्षांचा होता. भेट झाल्यानंतर 6 महिन्यांतच मारियाने शिक्षण सोडून बास्तियनसोबत राहायला सुरुवात केली होती. त्याच्या मोबदल्यात बास्तियन तिला पैसे द्यायचा. मारिया म्हणते बास्तियनची स्माइल मला खूप आवडते. तो इमानदार आणि गमतीशीर आहे. मी फिट दिसावी म्हणून त्याने माझ्यावर खूप पैसा खर्च केला आहे.

पैशाची पर्वा नाही
बास्तियन म्हणतो रोज संध्याकाळी मी 6 ते 12 लाख रुपये खर्च करतो. मला त्याची पर्वा नाही. मी कारच्या बाबतीतही खूप पॅशनेट आहे. माझ्याकडे 2 कोटी 66 लाखांची लॅम्बोर्गिनी अॅव्हेंटेडर आहे. तसेच बेंटले कॉन्टिनेंटल स्पोर्ट कारसह इतरही अनेक कार आहेत. लॉस एंजल्सच्या ज्या घरात बस्तियान राहत आहे, त्याचे भाडे महिन्याला सुमारे 7 लाख रुपये आहे. मला अनेक लोक हॉलीडेवर जायचा सल्ला देतात. पण मी रोजच हॉलीडे करतो असे तो सांगतो.

देश सोडल्याचे दुःख
बास्तियन म्हणतो, मी लॉस एंजल्समध्ये राहत असलो तरी, मला जर्मनी सोडून जाण्याचे दुःख आहे. तसेच लग्नाविषयी बोलताना तो म्हणाला की, मी आणखी दोन वर्ष याबाबत विचार करणार नाही. त्यानंतरच मी तसा विचार करेल.
पुढील स्लाइड्सवर पाहा, बस्तियानच्या लक्झरियस लाईफचे काही PHOTOS